Headlines

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. 
2. वृषभ : घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्‍यांनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. 
3. मिथुन : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी.
4. कर्क : गरज नसताना आक्रमक होऊ नका. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे.
5. सिंह : मुलांचे प्रेम वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
6. कन्या : बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्‍यांचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. 
7. तूळ : जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल.
8. वृश्चिक : मनाची चलबिचलता जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. क्षुल्लक मानसिक समस्या जाणवू शकतात. 
9. धनु : तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका.
10. मकर : व्यापारासाठी योग्य काळ. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. दिनक्रम व्यस्त राहील.
11. कुंभ : नवीन गोष्टी शिकाल. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. मनाचा आवाज ऐकावा.
12. मीन : घाईघाईने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. 
21 सप्टेंबर 2020 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *