Headlines

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

मेष : योग्य मान मिळेल. आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. 
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. जुन्या ओळखीच्या लोकांच्या भेटी होतील. स्पर्धकांना नामोहरम करायला थोडे अधिक कष्ट पडतील. 
 मिथुन : घरातील कामे पूर्ण होतील. दिवस धावपळीचा जाईल. मुलांकडून सकारात्मक वार्ता मिळतील. तुमचे मनोबल वृद्धिंगत होईल.
 कर्क : घाईघाईने कामे करावी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल. आध्यात्मिक आवड वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या विचारावर ठाम राहाल.
सिंह : लोकांची प्रशंसा लाभेल. कामे जलद गतीने उरकावी लागतील. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. सरकारी योजनांचा लाभ मिळवाल.
 कन्या : दिवस आनंदात जाईल. घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या. व्यापारी कौशल्य वापराल. पुढील सोयीसाठी गुंतवणूक कराल. 
तूळ : कामाचा व्याप वाढेल. जुनी कामे मार्गी लावाल. संमिश्र घटनांचा दिवस. मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. 
वृश्चिक : शांत डोक्याने विचार करावा. विचारपूर्वक कामे करावीत. आव्हान स्वीकारताना सावध राहावे. अथक मेहनत यश मिळवून देऊ शकेल. 
धनु : मनातील इच्छा पूर्ण होईल. दिवसाचा बराच काळ धार्मिक कामात घालवाल. समाजात तुमचा मान वाढेल. धनसंचयात वाढ होईल. 
मकर : आपले मत योग्य प्रकारे पट‍वून द्याल. दिवसभर कामाची धावपळ राहील. वडीलधार्‍यांना नाराज करू नका. अनावश्यक खर्च टाळावेत.
कुंभ : विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. भागीदाराच्या मताचा आदर करावा. तरच यशदायी परिणाम दिसतील. प्रलंबित येणी प्राप्त होतील.
 मीन : अति विचार करत बसू नका. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सापडतील. व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक असेल.
22 सप्टेंबर 2020 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *