जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अति विचार करत राहू नये. 
2. वृषभ : जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल.
3. मिथुन : चालत आलेली संधी ओळखा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल. कामातून समाधान मिळेल. मन प्रसन्न राहील.
4. कर्क : मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. 
5. सिंह : आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. विरोधक नामोहरम होतील.
6. कन्या : प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.
7. तूळ : बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. 
8. वृश्चिक : आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. 
9. धनु : मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. 
10. मकर : जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा. आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मनातील इच्छा पूर्ण होईल.
11. कुंभ : नोकरी-व्यवसायात सन्मान मिळेल. दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील.
12. मीन : चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळाव.
 23 सप्टेंबर 2020

Leave a Reply