जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : आत्मविश्वास बाळगून काम करा. नातेवाईकांशी व्यवहाराने वागा. आज दिनक्रम व्यस्त राहील. मनाचा तोल सांभाळावा.

2. वृषभ : इतरांकडून स्तुती केली जाईल. सतत काम करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा. ग्रहमानाची साथ मिळेल. धनसंचय वाढीस लागेल.

3. मिथुन : वागणे आणि बोलणे यांचा मेळ साधावा. दिवस धावपळीत जाईल. मात्र नियोजित काम पूर्ण होईल असे नाही.

4. कर्क : विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. घरातील कामात अडकून पडाल. रचनात्मक कामात आनंद मिळेल. व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होईल.

5. सिंह : आपल्या चांगुलपणाला तडा जाऊ देऊ नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्यावे. कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज कराल.

6. कन्या : आळस बाजूला सारावा लागेल. आपल्यातील कला जोपासा. कामाचा अधिक ताण जाणवेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल.


7. तूळ : हातातील काम मनापासून करावे. कामातून चांगले समाधान मिळेल. आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल.

8. वृश्चिक : आहारातील पथ्य पाळा. अंत:करणापासून समोरच्याला मदत करा. प्रेम संबंधातील ओलावा वाढेल. नातेवाईक मदतीला येतील.

9. धनु : आज आखलेले काम सुरळीत पार पडेल. जास्त काळजी करू नये. स्पर्धा परीक्षेसंदर्भात सकारात्मक वार्ता मिळेल.

10. मकर : उगाचच कोणाची खोडी काढू नका. कामाचा व्याप वाढता राहील. जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या बाबतीत गाफिल राहू नका.

11. कुंभ : फसव्या लोकांपासून सावध रहा. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्या. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

12. मीन : व्यावसायिक प्रगती साधता येईल. मनोकामना पूर्ण करणारा दिवस. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे.

3 ऑक्टोबर 2020

Leave a Reply