Horoscope

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : अति उत्साहीपणा अंगाशी येऊ देऊ नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेवू नका. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा महत्त्वाचा करार होऊ शकेल. 

2. वृषभ : अचानकपणे ओढवलेल्या विचारांच्या गुंतागुंतीवर शांतपणे काम करा. कोणाच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. 

3. मिथुन : भागीदारीमध्ये कार्य केल्यास फायदा होईल. आपल्या आक्रमकतेला आवर घाला. आजचा दिवस रचनात्मक असेल.

4. कर्क : आपल्या सामाजिक कार्यामुळे लोकांमध्ये चर्चेत राहाल. मित्रांकडून येणारी उधारी वसूल होईल. आजचा दिवस सृजनात्मक असेल.

5. सिंह : छोटे प्रवास घडतील. मुलांच्या शिक्षणासाठी योग्य काळ. दिनक्रम अतिशय व्यस्त राहू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

6. कन्या : आहारातील सर्व पथ्ये पाळा. जोडीदाराशी सामंजस्याने वागा. वाणी आणि व्यवहार संयमित ठेवणे हिताचे ठरेल. 

7. तूळ : दिवस आनंदी व समाधानी जाईल. भागीदारी व्यवसायात कोणत्याही नवीन कामासाठी तडजोड करू नका. लाभदायक दिवस. 

8. वृश्चिक : नोकरी व्यवसायात आपल्या मनासारखी गोष्ट झाली नाही तरी शांत डोक्याने काम करा. वरिष्ठांकडून योग्य तोच निर्णय घेतला जाईल. 

9. धनु : विद्यार्थ्यांना नवीन संधी शोधण्यासाठी खूप उत्तम काळ. दिवसाचा उत्तरार्धात अधिक मनोरंजन होईल. सावधगिरीने व्यवहार करण्याचा दिवस. 

10. मकर : नोकरी व्यवसायात एखाद्या कामाच्या बाबतीत काही संभ्रम असल्यास निर्णय घेताना थोडा वेळ मागून घ्या. आजचा दिवस सामान्य असेल. 

11. कुंभ : अचानकपणे प्रश्नाची उत्तरे सुटतील. नोकरीत आपले म्हणणे लोकं ऐकतील. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे दिवस. 

12. मीन : व्यवसायात पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आपले मत नोंदवू नका. बोलताना पूर्ण विचार करा. आजचा दिवस लाभदायक असेल. 

 6 ऑक्टोबर 2020 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!