जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य..

1. मेष : व्यवसायात मोठी चांगली घटना घडेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर पडा. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर दिलासादायक घटना घडू शकतील. 

2. वृषभ : जीवनस्तर सुधारण्यास उपयुक्त असलेल्या वस्तूंची केवळ खरेदी करावी. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. पाहुण्याचे आगमन होण्याचे योग.

3. मिथुन : प्रगतीची गती कायम ठेवणे आपल्या हातात आहे. अन्यथा भविष्यात आपल्या प्रतिमा, प्रतिष्ठेला धक्का लागू शकेल. निष्काळजीपणा टाळावा.

4. कर्क : काही गोष्टी काळावर सोडून केवळ प्रयत्नशील राहावे. समस्यांचे निराकरण शक्य. कुटुंबाप्रतीच्या समर्पण वृत्तीमुळे स्नेह मिळेल. 

5. सिंह : नोकरदार वर्ग, व्यवसायिकांनी आळस आणि आराम त्यागून केवळ कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल.

6. कन्या : नोकरदार वर्गाला काही ना काही लाभ मिळू शकतील. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही असेल. सुख, शांततेची अनुभूती घ्याल.

7. तूळ : सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रात विरोधक, हितशत्रूंच्या कारवाया त्रस्त करू शकतील. मानसिक दुर्बलता टाळावी.

8. वृश्चिक : व्यवसायातील काही वाद संपुष्टात येऊ शकतील. सारासार विचार करून गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत. नकारात्मक विचार टाळावेत. दिवस अनुकूल राहील.

9. धनु : कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना निष्काळजीपणा करू नये. आत्मविश्वास आणि उत्साह वृद्धिंगत होईल.

10. मकर : आपल्या कर्तृत्वावर यश मिळवाल. खूप कष्ट करण्याची तयारी दाखवा. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मान, सन्मान वाढतील.

11. कुंभ : नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. अधिकारी वर्गाच्या पाठिंब्याचा लाभ मिळू शकेल. 

12. मीन :  घरामध्ये अनावश्यक खरेदी करू नका. आहारात अति तिखट पदार्थ टाळा.

 11 ऑक्टोबर 2020 

Leave a Reply