Headlines

“जागातीक शौचालय दिवस २०२०” च्या निमित्ताने ई- मॅरोथॉनचे आयोजन

               

   ई- मॅरोथॉन….. आरोग्यदायी, स्वच्छ आणि निरोगी वातावरणासाठी

प्रतिंनिधी /उस्मानाबाद -१९ नोव्हें.  “जागातीक शौचालय दिवस २०२०” च्या निमित्ताने ई- मॅरोथॉनचे आयोजन करण्यात आले असून याचा  हेतू देशातील नागरिकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याबाबत  जागरुकता निर्माण करणे हा आहे.  ई- मॅरोथॉनमध्ये  सर्व वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात, त्यात ४२ किमी फुल मॅरोथॉन आणि २१ किमी हाफ मॅरोथॉन चा समावेश आहे, हे ई- मॅरोथॉन  १५ नोव्हे ते १९ नोव्हें २०२० या कालावधीत पूर्ण करू शकता.

यात सहभागी होण्यासाठी विशिष्ठ ठिकाणांची निवड करून सहभाग्यांनी एकत्र येण्याची किंवा गर्दीसारखी  परिस्थिती निर्माण करण्याची गरज नसणार आहे. तसेच सहभागींनी प्रशासकीय नियम पाळून या ई- मॅरोथॉनमध्ये सुरक्षित अशा ठिकाणांचीआणि योग्य वाटेल त्या वेळेची निवड करून आपली धाव पूर्ण करू शकतो. १ लाखापेक्षा अधिक व्यक्ती देशाच्या कांनाकोपर्‍यातून भागातून ई- मॅरोथॉन सहभागी होतील. त्याचप्रमाणे विदेशांतून सुद्धा ई- मॅरोथॉनमध्ये लोक सहभागी होत आहेत. 

या ई- मॅरोथॉनमध्ये सहभागी सुरक्षित अशा ठिकाणांची म्हणजेच खुले मैदान, घराच्या आत, घराच्या छतावर, सोसायटीच्या आवारात इ. स्थळांची निवड करू शकतो. आपण १००० पाउल म्हणजेच १ किमी. असे अंतर गृहीत धरणार आहोत. या धावेचे निरीक्षण अॅप च्या माध्यमातून केले  जाईल . जे व्यक्ती फुल आणि हाफ ई- मॅरोथॉन यशस्वी पणे पूर्ण करतील त्यांना यशस्वी सहभाग घेतल्या बाबतचे  ई- प्रमाणपत्र आयोजकांकडून देण्यात येईल.  

ई- मॅरोथॉन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले आहे, ज्यात, युनिसेफ, प्लॉन इंटरनॅशनल, एन.एस.सी. फाउन्डेशन, तेर्रे देस होम्स, सेव्ह द चिल्ड्रन, वॉटर एड, राष्ट्रीय सेवा योजना आणि सी.वाय.डी.ए. संस्था इ. चा समावेश आहे. 

सर्वांसाठी स्वच्छ वातावरण, सुधारित स्वच्छता आणि  शास्वत स्वच्छता राखणे हे निरोगी जीवन आणि समृध्दी साठी एक मोठे आव्हान आहे. मी आशा करतो कि, स्थानिक पातळी वर जागतिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी ई- मॅरोथॉन लाखो लोकांना कार्य करण्यात प्रेरित करेल.- युसुफ कबीर, वॉश स्पेशालीस्ट, डी.आर.आर. अॅन्ड इमरजन्सी फोकल पोइन्ट, युनिसेफ महाराष्ट्र.

कोविड- १९ सारख्या साथीच्या आजारामुळे लहान मुलांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रामुख्याने गरीब मुले शाळाबाह्य, असुरक्षित आणि निराशाजनक स्थितीत गेली. सर्वांसाठी चांगले जग निर्माण करण्यासाठी आपण कठोर प्रयत्न केले पाहिजे. ई- मॅरोथॉन च्या माध्येमातून  मुलांसाठी योग्य असलेला आपला देश  तयार करण्यास मदत होईल, आपल्याला सहयोगाने जागतिक स्वच्छताविषयक संकटांचा सामना करता येईल. – इस्पिता दास, वरिष्ठ व्यवस्थापक, महाराष्ट्र, सेव्ह द चिल्ड्रन.

 पर्यावरणातील बदलामुळे मुलांवर आणि त्याच्या मुलांच्या भविष्यवरही परिणाम होत आहे    चांगले वातावरण, पर्यावरणविषयक धोरणे आणि शाश्वत जीवन जगण्यासाठी लाखो मुले व तरुण रस्त्यावर निदर्शने करीत आहेत. मुलांचा आवाज ऐकण्याची आणि त्यास गंभीरपणे घेण्याची वेळ आली आहे. जागतिक हवामान, पर्यावरण विषयक धोरणे आणि अधिक शाश्वत जीवनशैली मिळावी यासाठी #MyPlanetMyRights जागतिक अभियान राबविते. आम्ही तरुणांना हवामान बदल आणि शाश्वत स्वच्छतेकडे एकता व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने ई- मॅरोथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो.- संपत मांडवे, तेर्रे देस होम्स.

जास्तीत- जास्त लोकांनमध्ये  आरोग्यदायी, निरोगी आणि स्वच्छ जगासाठी वातावरण तयार करण्यासाठी हि मोहीम पाच दिवसासाठी आयोजित करत आहोत. आपण एकत्रित बदल करू शकतो आणि देशातील १००००० पेक्षा जास्त लोक या ई- मॅरोथॉनमध्ये सामील होतील.- मॅथ्यु मत्तम, सी.वाय.डी.ए.

नोंदणी विनामूल्य आहे, आणि  १४ नोव्हेंबर पर्यंत करायची आहे. नोंदणी करण्यासाठी पुढील वेबसाईटचा वापर करावा www.cydaindia.org. अधिक माहितीसाठी संपर्क:- [email protected] Mo.no.- 8767734511 अशी माहिती युनिसेफ चे जिल्हा समन्वय्य्क अप्पासाहेब धनके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *