“ जागतिक हात धुणे दिवस “ बद्दल विविध ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन

 

प्रतिनिधी /उस्मानाबाद – सेंटर फॉर यूथ अँड अॅक्टीव्हिटीज आणि युनायटेड नेशन चिल्ड्रेंस फंड च्यावतीने उस्मानाबाद ,वाशीम,नंदुरबार,गडचिरोली, परभणी ,औरंगाबाद या सहा जिल्ह्यांमध्ये मागील वर्षापासून वॉश या घटकांवर  त्या त्या जिल्ह्यांतील शिक्षण विभागासोबत या संस्था कार्य करीत आहेत.

       याचाच एक भाग म्हणून १५ ऑक्टोबर रोजी “जागतिक हात धुणे” दिवस च्या निमित्ताने राज्यस्तरीय हात धुणे अभियान राबविण्यात येणार आहे ,हे अभियान ११ ते १५ ऑक्टोबर दरम्यान राबविले जाणार आहे. मुलांना हात धुण्याच महत्व तसेच त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये हात धुण्याच्या सवयीबद्दल जनजागृती व्हावी, असा या अभियानाचा उद्देश आहे .

       या अभियानाअंतर्गत शालेय मुला-मुलींसाठी विविध ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यानी www.cydaindia.org या वेबसाइट ला भेट द्यावी, तसेच अधिक महितीसाठी ८७६७७३४५११ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत विद्यार्थ्यानी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन युनिसेफ चे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक अप्पासाहेब धनके यांनी केले आहे.   

Leave a Reply