Headlines

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यशोदा पार्क येथे वृक्षारोपण

 

बार्शी/प्रतिनिधी : आज जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने कासारवाडी रोडवरील यशोदा पार्क परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

बार्शी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा.विश्वासभाऊ बोरबोले यांच्या शुभहस्ते व बार्शी वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष मा.उमेशजी काळे यांचेसह मंडळाचे मार्गदर्शक मा.लक्ष्मण लवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हनुमंत तिकटे यांनी केले.या औचित्याने प्रमुख मान्यवरांनी  यथोचित मनोगते व्यक्त केली.यावेळी यशोदा पार्कचे अध्यक्ष विनोद गायकवाड,सचिव धनंजय काळे,मंडळाचे सदस्य मच्छिंद्र पवार,किरण लांडे,रणजित दराडे,श्रीकांत ढेरे,सुहास लवळे,रणजित सोळगे,रवी सोनवणे,सुलतान शिकलगार,सचिन लवळे यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शंकर अंकुश यांनी तर आभार खजिनदार गणेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *