AgricultureBreaking News

जलसंजीवनीच्या पुढाकाराने बार्शी तालुक्यातील बचत गटांनी सुरू केले गृहद्योग

बार्शी: कृषी विकास वा ग्रमिन प्रशिक्षण संस्था मलकापूर  व मुंबई जॉन डियर यांच्या सहयोगाने जलसंजीवनी दुष्काळजन्य उपक्रम वैराग प्रकल्पातील समाविष्ट सुर्डी यावली उंडेगाव रस्तापूर ईर्ले गावातील बचत गटांना क्षमता बांधणी करून त्यातील यावली येथे दिशा महिला स्वयंसहाय्यता गट, यावली या बचत गटास ‘मिरची कांडप यंत्र’ देऊन सोलापुरी झणझणीत काळा मसाला तांबडे तिखट तयार करणे’  हा उद्योग स्थापन करण्यात आला. या उद्योगातील बचत गटातील महिला एकत्र येऊन गावात व आसपासचे हॉटेल्स यांना हे तयार मसाले विकत आहेत. तसेच उंडेगाव येथे लक्ष्मी कलंमजियम महिला बचत गट,उंडेगाव येथे ‘जलसंजिवनी’ दुष्काळ सज्जता उपक्रम मधून वैयक्तिक कुकूटपालन व्यवसाय मधील कोंबडी पालन पिंजरा व कोंबड्या यांना अर्थसाहाय्य करून हा व्यवसाय स्थापन करण्यात आला याचे मार्केटिंग गावात व वैराग भागातील परिसरात होत आहे. तसेच या गटातील महिलांचे मनोगतांचे चित्रीकरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!