Headlines

जनावरांचा आठवडी बाजार साळेगाव येथेच भरणार , अफवांवर विश्वास ठेवू नये — सरपंच कैलास जाधव पाटील

केज /अमर पाठक :- केज तालुक्यातील साळेगाव येथे भरणारा प्रसिद्ध असा जनावरांचा आठवडी बाजार हा मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने पूर्वी प्रमाणे साळेगाव येथेच भरणार असून खोडसाळपणे सोशल मिडयावर अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
साळेगाव ता. केज येथे मागील ५० वर्षा पेक्षा अधिक काळा पासून दर गुरूवारी जनावरांचा व शेळ्या मेंढ्यांचा आठवडी बाजार अखंड भरत आहे. परंतु कोरोना व्हायरसचा संसर्ग किंवा फैलाव होवू नये आणि नागरिक व बाजारकरी मंडळी यांच्या जिविताला कोणताही धोका किंवा हानी पोहोचू नये. त्यांना त्रास सहन करावा लागू नये. म्हणून मा. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बीड जिल्ह्यातील सर्व नियमित भरणारे आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे साळेगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार पुढील आदेशा पर्यंत बंद आहेत. याचा गैरफायदा घेऊन आणि मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा विरुद्ध काही लोकांनी खोडसाळपणा करून शेजारच्या गावा जवळ आडरानात आणि पारधी समाज बांधवांच्या वस्तीच्या शेजारी बाजार भरणार असल्याच्या अफवा पसरविण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला आहे.
अशा अफवा पसरविणाऱ्या विरुध्द रितसर कार्यवाही करण्यात येणार आहेत. तेव्हा शेतकरी, व्यापारी बांधव आणि भाजीपाला विक्रेते यांनी कोणीही अफवांवर किंवा अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांचे पुढील आदेश प्राप्त होताच साळेगाव ता. केज येथील दर गुरुवारी भरणारा जनावरांचा आठडी बाजार हा व्यापारी व ग्राहक यांच्या सर्वसुख सुविधेने पुन्हा नियमित सुरू करण्यात येणार आहे. असे सरपंच कैलास जाधव, ग्रामसेवक, तलाठी, सर्व व्यापारी मंडळ, ग्रामस्थ, आणि हितचिंतक यांनी कळविले आहे.

Leave a Reply