जनतेने भाजपाचा पराभव करावा – भाकप

 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकी बाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका

 

बार्शी – राज्यात व देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हल्ला करणाऱ्या सांप्रदायिक भाजपाचा पराभव करावा ,असे आवाहन जनतेस भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आले आहे. देशाला भांडवली शक्तींच्या हवाली करून श्रमिक वर्गाचे जगणे अवघड करून समाजात जातीय व धार्मिक तेढ वाढविणाऱ्या भाजपाचा पराभव पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत होणे आवश्यक झाले आहे.


त्यामुळे जनतेला भाजपाचा पराभव करण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौन्सिल सेक्रेटरी कॉम्रेड प्रवीण मस्तुद व कम्युनिस्ट पक्ष राज्य कौन्सिल कार्यकारणी सदस्य कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply