yuva sanvaad

चीनी कंपन्यांची पंतप्रधान केअर फंडाला मदत आणि राष्ट्रवाद

भारत चीन  सिमा युध्दा नंतर बरेच मुद्दे चर्चेला आले आहेत.  चीन ने गलवान घाटीवर आक्रमण करून तेथील जमीण ताब्यात घेतल्याचे चीन सारखे सारखे बोलत आहे.  यावेळी या सिमा युध्दात आपले 20 जवान शहिद झाले आहेत,  हे अत्यंत तिव्र दुःख आपल्या समोर आहे.  अशातच चीनच्या ताब्यात गेलेली जमीण मिळवणे चीनींना मागे हाटवणे व महत्वाचे म्हणजे शहिद झालेल्या जवाणांचा बदला घेणे आवश्यक झाले आहे.
भारत चीन सिमा युध्दावर  राहूल गांधी यांनी त्यांचा टिटवरून टिवट केले आहे त्यात ते म्हणतात,

तू इधर उधर की न बात करए 
ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटाए 
मुझे रहज़नों से गिला तो हैए 
पर तेरी रहबरी का सवाल है।

गितांच्या अशा ओळी टाकून चीनींनी भारताची हाडपलेल्या जमीणीचे काय झाले,  असा सवालही विरोधी पक्षाने उभा केला आहे.

परंतू या प्रश््मनाचे उत्तर देण्याऐवजी, भाजपा सरकाणे 59 अॅप बंद करत असल्याची सूचना काढली आहे.   परंतू ही सूचना काढत असताना ती चीनचा बदला घेत असल्याचे सांगितले नाही.  त्याचप्रमाणे या आदेशात चिनचा कुठलाही उल्लेख नाही.  असे असताना गोदीमिडीया सरकारणे चिनचा बदला घेण्यासाठी हे अॅप बंद करत असल्याचे सांगत आहेत.  सरकारणे या बाबत म्हणणे मांडण्या ऐवजी मिडीया हे म्हणणे मांडत आहे  हे अत्यंत विचित्र आहे.   यातून असा प्रश्न निर्माण होतो की, 20 शहिद झालेल्या जवाणांना या अॅप बंदी घालून शहिदांचा बदला घेतला जाणार आहे काॽ असेल तर सरकार या आदेशात चिनचा स्पष्ट उल्लेख का करत नाहीॽ  असे ही प्रश्न केले जात आहेत की, हे अॅप बंद करून आपल्या देशाची चिनने हडपलेली जमीण परत मिळणार आहे काॽ हे अॅप बंद करून आपन चिनचे आर्थिक कंबरडे मोडत असताना आपल्या देशातील काही लेबर फोर्स हा अॅपवर काम करत असेल तर त्यांच्या निर्माण झालेल्या बेरोजगारीचे कायॽ  का हे सर्व भावनीक करून जनतेमधील कमी होत असलेले स्थान भाजपा परत मिळवण्याचा मार्ग म्हणून हा आदेश काढून राष्ट्रवादाची भावना फुलवून मुख्य कामापासून पळ काढत आहे कायॽ

विशेष म्हणजे या युध्दाच्या पार्श्वभूमीवर आनखी बरेच प्रश्न निर्माण केले गेले आहेत.  मोदी सरकार स्वतः अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेले जनतेत सांगत असतात.  किमान दिखावा तरी तसा केला जात आहे.  बाकी सर्व पक्ष चोर आणि मोंदींची भाजपा, आरएसएस,  आणि त्यांचे सहकारी साव असा तो आव आनला जात असतो त्यावरच प्रष्न निर्माण केले जात आहेत.

कोविड 19  साठी पंतप्रधान मोदी यांचे पीएम केअर फंड योजनेमध्ये चीनी कंपन्यांनी करोडो रूपये दिले आहेत व ते पंतप्रधान फंडाने स्विकाले आहेत.  राष्टवादाच्या, देशभक्तीच्या बाथा मारूण निवडणूक जिंकणारे, देशप्रेमाचे सल्ले देवून बाकी सर्व विरोध देशाच्या विरोधी कसे कारवाया करत आहेत याची मांडणी करणारे तसेच  भाजपाच्या कडवट धोरणांना विरोध करणारांना देशद्रोही ठरवण्याचा ठेका घेणारी भाजपा, आरएसएस व त्यांचे बगलबच्चे चिनी कंपनी कडून आलेल्या पैशा बद्दल गप्प आहेत, विषेश म्हणजे या फंडाचा हिशोब जनतेसमोर मांडला जाण्याची शक्यता नाही.

कोविड 19 साठी पंतप्रधान मोदी यांचे पीएम केअर फंड मध्ये टिकटाॅक या कंपनी कडून 30 करोड रूपये,   शॉयोमिन या कंपनी कडून 10 करोड रूपये,   हुआयु या कंपनी कडून 7 करोड रूपये,   वनप्लस या कंपनी कडून 1 करोड रूपये, अॅपो या कंपनी कडून 1 करोड रूपये त्यासोबतच चिनी कंपन्यांची ज्यात जास्त गुंतवणूक  आहे त्या,  पेटीएम या कंपनी कडून 500 करोड रूपये, ओला या कंपनी कडून 5 करोड रूपये तसेच ओयो या कंपनी कडून 2.5 करोड रूपये पंतप्रधान, पीएम केअर फंडाकडे जमा झाले आहेत.  यातील काही पैसे हे 5 मेच्या आस पास जमा झाले आहेत की,  ज्यावेळी गलवान घाटी येथे भारत चिन सिमे दरम्यान तिव्र तनाव वाढत चालला होता.  या केअर फंडाबाबत पीएमओ कार्यालय म्हणते आहे “हा फंड सार्वजनिक अधिकाराचा फंड नाही” याचा अर्थ असा की, आम्ही कुणाकडूनही पैसे घेवू व कोणालाही पैसे देवू, हा फंड माहिती अधिकारात व आॅडीटसाठी लागू होत नाही,   असे असेल तर हा पैसा आरएसएस कडे त्या त्यांच्या संलग्न संघटनांसाठी कि ज्या देशात धर्मव्देशाची भाडकवत आहेत त्यांना दिला गेला जाण्याची दाट शक्यता आहे.


लाॅकडाउन काळात आरएसएस चे कार्यकर्ते व भाजपाचे पुढारी यांनी चालत जाणार्यांना काहीही मदत केली नाही किंवा गरिबांना अन्न दानही केले नसल्याचे  उभ्या देशाने पाहिले आहे,  परंतू हे कार्यकर्ते पीएम केअर फंडात पैसे जमा करण्याच्या गडबडीत असल्याचे ठिकठिकाणी सर्वांनी पाहिले आहे.

भारत देशातील सर्वात मोठ्या नोटबंदी मध्ये बर्याच बाबी ह्या असंगत स्वरूपात समोर आल्या होत्या त्यावर नोटबंदीचा हिशोब डाव्या पक्षांनी मागत देशभर अंदोलने उभा केली परंतू हा हिशोब आजतागायत दिला गेला नाही.  भ्रष्टाचार संपवणे,  दहतवादाचे कंबरडे मोडाणे अशा बतावण्या स्वतः पंतप्रधान मोदी करीत होते,   परंतू त्याचे काय झाले आहे हे आपण पाहत आहोत.  परंतू सत्तेचा फायदा घेत भाजपा, आरएसएस व त्यांचे बगलबच्चे अब्जाधिश करण्यासाठी या नोटबंदीचा वापर केला गेल्याची दाट शक्यता नकारता येणार नाही.

अशाच पध्दतीने पाकीस्थान समोर गुरगुरणारे मोदी चिन समोर गप्प बसून सर्व जनतेला चिनी अॅप बंद करायला सांगत आहेत तर दुसर्या बाजूला चिनी कंपनीकडून पीएम केअर फंडात पैस घेत आहेत.  मूळात भाजपाची मातृसंघटना असणारी आरएसएस ने आजपर्यंत कधीही त्यांच्या बैक अकाउंटचे आॅडीट केलेले नाही.   त्यामुळे भाजपा असो वा आरएसएस हे दुसर्याला देशभक्ती शिकवत देशद्रोही ठरवत असतात, परंतू खरा देशद्रोही व्यवहार हा भाजपा, आरएसएस चाच राहिला आहे.   देशाच्या विरोधात उभा राहिलेल्या चिन च्या कंपन्याकडून पैसे घेणे असेल,  त्याचा हिशोब न देणे असेल,  तसेच नोटबंदी चा हिशोब न देणे असेल, आरएसएस च्या बैक अकाउंटचे आॅडीट न करणे असेल हे सर्व भाजपा, आरएसएस चा खोटा राष्ट्रवाद समोर आननार्या बाबी आहेत.

भारत चिन सिमा युध्दा वर लेफ़्टिनेंट जनरल, सेवानिवृत्त,  एचएस पनाग यांनी एनडिटिव्ही चे रविश कुमार यांना दिलेल्या  मूलाखतीत म्ह्णतात,  सैन्यावर एकूण जीडीपीच्या 3 टक्केट रक्कम खर्च करण्यावची अपेक्षा आहे,  मिलीटरी मॉडरेशन करण्याससाठी ही 3 टक्केा रक्कम आवश्यक आहे,  आजच्या परस्थिातीत पेन्शनवरचा खर्च सोडून 1.6 ते 1.7 टक्के रक्क्म खर्च केली जात आहे,  जर आपन त्याला जिडीपीच्या 3 टक्केच करू तरच आपल्यापाशी क्षमता निर्माण होवून शकते,  परंतू असे केले गेले नाही,  आत्ताला मागील 5 वर्षात सैन्या वरील बजेट जे आहे ते पहिल्याक 10 वर्षापेक्षा कमी आहे.

पनाम यांनी मांडलेला मुद्दा लक्षात घेता फक्त सैन्यासमोर भाषणबाजी करून तसेच सैन्यासोबत फोटो काढून,  भावनीक होवून हे भागणारे नाही यासाठी करावयाची कृती,  करोडो रूपयांची संपती जमा केलेल्या खासदारांना लोखो रूपयांचे पेन्शन देण्या ऐवजी सैन्याचे सक्षमिकरण करण्यासाठी आर्थीक सोय करणे आवश्यक झाले आहे.

चिनी सेना भारताच्या जमिनीवर घुसलेली असताना,  20 जवान शहिद झालेले असताना,  पंतप्रधान मोदी आपल्या भाषणादरम्यान चिनचे नाव देखील त्यांच्या तोंडात घेत नाही, तो देश, तो देश ऐवढेच ते बोलत राहिले.   चिन भारताच्या भूमीवर घूसलेला असताना पंतप्रधान मोदींकडून,  तो भारताच्या भूमिवर घूसलेला नसल्याचे सांगितले जात आहे आणि विशेष म्हणजे या सर्व बाबींवर प्रश्न निर्माण करणार्या लेखक, पत्रकार यांना देशद्रोही ठरवले जात आहे. देशा बद्दल काही बोलणारांना देशद्रोही ठरवून राष्टवादाचा नवी भाषा भाजपा निर्माण करत आहे.

देशातील एकूणच श्रमिकांच्या भौतिक प्रश्नांची सोडवणूक न करता किंवा ते प्रश्न तिव्र करून शोषणाची चक्रे आधिक वेगवान करून भावनीक प्रश्नांना फुंकर घालणे हा मुख्य अजेंडा भाजपा,  आरएसएस चा राहिला आहे,  त्यामुळे राष्टवादाच्या नावाने फसवणूक करण्याची ही रणनिती आहे, चीनी कंपन्यावर चालणारा पंप्रधान केअर फंडाच्या निमित्ताने आरएसएस व त्यांच्या भाजपाचा खोटा  राष्टवाद समजून घेता येईल.

ताक- जागतिक आनंदी देशात भारताचा 140 वा नंबर लागला आहे, तर शेजारील देश नेपाल (15), पाकिस्तान (29), बांग्लादेश (107) आणि श्रीलंका (130) यांचे नंबर असे आहेत.  संयुक्त् राष्ट्राने जागतिक आनंदी दिवसाच्य निमित्ताने 156 देशांच्या सर्वे करून हा रिपोर्ट बनवला आहे.  सर्वात आनंदी देश तो आहे ज्या देशातील लोकांना आपले पणाची जाणीव होते, जेथील लोक आपआसात एकदुसर्यावर तसेच आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवत, आनंद घेतात.

लेखक- प्रविण मस्तुद, 9960312963

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!