चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

डेहराडून-पद्मविभूषण ने सन्मानित प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि चिपको आंदोलनाने आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे सुंदरलाल बहुगुणा यांचे शुक्रवारी कोरोना  संक्रमण तसेच वयोवृद्ध आणि विविध रोगांनी ग्रस्त असल्या  कारणाने उत्तराखंड येथील  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान या ठिकाणी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.

श्री बहुगुणा यांना 8  मे रोजी कोरोना संक्रमित झाल्यानंतर एम्स ऋषिकेश या ठिकाणी आणण्यात आले होते. आज दुपारी बारा त्यांनी वाजता अंतिम श्वास घेतला. गुरुवारी एम्सचे जनसंपर्क अधिकारी हरीश थपलीयल  यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.

याच दरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि दुपारी त्यांचे निधन झाले. राज्यपाल बेबी  रानी मौर्य , मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत , विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह महेश जोशी , पूर्व राज्यमंत्री धिरेंद्रा प्रताप आदींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply