चिकुंद्रा गावास जि प अध्यक्ष यांची भेट.

प्रतिनिधी / पुरूषोत्तम विष्णु बेले –  जिल्हाभरात कोरोना  चा वाढता प्रभाव पाहाता प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी ही सजगपणे काम करताना दिसत आहेत. तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गावात दि १० ऑगस्ट रोजी कोरोना  चा पहिला पॉजिटिव रूग्ण आढळून आला. ही बाब लक्षात घेऊन उस्मानाबाद जिल्हा परिषद च्या अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे यांनी चिकुंद्रा गावास भेट देऊन आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे १०० नग, १०० सॅनिटाइजर, व मास्क चिकुंद्रा ग्रामपंचायत ला देण्यात आल्या. गावात कशा प्रकारे खबरदारी घेतली जात आहे याची माहिती ग्रामसेवक विनेश कांबळे व समुदाय आरोग्य अधिकारी एम. एम. शेख यांचेकडून जाणून घेऊन, कशाप्रकारे अधिकाअधिक काळजी घेऊन गाव कोरोना  मुक्त करता येईल याची माहिती दिली. रात्री उशिरा पर्यंत थांबून अध्यक्षा ताई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य सेविका एस. बी. गोरे, आशा कार्यकर्त्या एस. डी. एकंडे, आर. आर. जाधव, सरपंच राणबा जाधवर, नेहरू युवा केंद्र तुळजापूर स्वयंसेवक पुरूषोत्तम बेले, प्रा. संजय मोटे, नजीर शेख यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *