Headlines

चारा पिकांच्या बियाण्यासाठी अर्ज करण्याचे शिवार हेल्पलाइन कडून आवाहन

उस्मानाबाद :- राष्ट्रीय पशुधन अभियान २०२१-२१ अंतर्गत वैरण बियाणे प्रापण, संकलन व वितरण या योजनेखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना सुधारित जातीच्या चारा पिकांच्या बियाण्याचे आणि बहुवार्षिक चारा पिकांच्या ठोंबाचे वाटप शंभर टक्के अनुदानावर करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. प्रति १० गुंठे (१० आर) जमीन क्षेत्रासाठी चारा पिकांच्या बियाण्याचे आणि ठोंबाचे वाटप करण्यात येत आहे. १० गुंठे क्षेत्रासाठी बारामाही सिंचनाची सुविधा असलेल्या पशुपालकांना बहुवार्षिक चारा पिकांच्या ठोंबाच्या वाटपासाठी अर्ज सुरू झाले आहेत.

इच्छुक लाभार्थ्यांनी अर्जाच्या स्वरूपातील प्रस्ताव नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे दिनांक ०५ एप्रिल २०२१ ते ०४ मे २०२१ पर्यंत च्या कालावधीत सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि सोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी व शर्ती याबाबतचा तपशील लाभार्थ्यांची निगडित असलेल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणि संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेचे संस्थाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेचा अनुसूचित जाती,जमाती प्रवर्गातील पशुपालक, शेतकरी या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा.


शेतकरयांना अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.


यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग ,राष्ट्रीय सेवा योजना व मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय मुंबई,

या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था सर्वांचे सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply