Headlines

चळवळ जिवंत ठेवणे हीच कॉ.उद्धव भवलकर यांना खरी श्रद्धांजली – कॉ.नरसय्या आडम मास्तर




सिटू च्या वतीने कॉ.उद्धव भवलकर व दत्तोबा आडम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण ! 
सोलापूर  –  मराठवाडा आणि औरंगाबाद शहर जिल्ह्यात कामगार चळवळ उभी करून दैदीप्यमान इतिहास निर्माण करण्यात कॉ.उध्दव भवलकर यांचा सिंहाचा वाटा होता. सच्चा, प्रामाणिक, लढाऊ, निर्भिड आणि परखड स्वभावाचा जनतेतला नेता होता.यांच्या आकस्मिक निधनाने नवोदित कार्यकर्त्यांवर चळवळीची मोठी जबाबदारी आलेली आहे.चळवळ अखंडीत ठेवणे हीच खरी श्रद्धांजली असेल.तसेच माझे धाकटे बंधू दत्तोबा आडम हा नेहमी मला कौटुंबिक आधार देऊन माझे मनोधैर्य वाढवत असे. त्याच्या अचानक जाण्याने माझ्यावर मोठा आघात झाला असे म्हणत नरसय्या आडम ( मास्तर )  शोक व्यक्त करताना भावनाविवश झाले.
 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दत्तनगर पक्ष कार्यालय येथे कॉ.उद्धव भवलकर आणि कॉ दत्तोबा आडम हे अनंतात विलीन झाले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली  वाहण्यात आली आणि शोकसभा पार पडली.  
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अँड एम.एच.शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात कॉ.उद्धव भवलकर यांचे चळवळीत योगदान आणि कार्यावर प्रकाश टाकले आणि त्यांचा ध्येय  पूर्ण करण्याची जबाबदारी नवोदित कार्यकर्त्यांची आहे अशा शब्दांत शोकसंदेश व्यक्त केले. 
 व्यासपीठावर नगरसेविका कामिनी आडम, नसीमा शेख, सिद्धपा कलशेट्टी, नलिनी कलबुर्गी,व्यंकटेश कोंगारी, शेवंताताई देशमुख,सुनंदा बल्ला, कुरमय्या म्हेत्रे, युसूफ मेजर,रंगप्पा मरेड्डी,प्रा.अब्राहम कुमार, मशप्पा विटे,अनिल वासम आदी उपस्थित होते. 
   
यावेळी सिद्धपा कलशेट्टी, युसूफ मेजर, माशप्पा विटे,नसीमा शेख, दत्ता चव्हाण, किशोर मेहता, विल्यम ससाणे,अब्राहम कुमार,सलीम पटेल, विक्रम कलबुर्गी ,आदींनी मनोगत व्यक्त केले.या शोकसभेचे सूत्रसंचालन कॉ अनिल वासम यांनी केले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित राहून पुष्पांजली अर्पण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *