Headlines

गोविंदपूरा,जुनीपेठ परिसरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्शवभूमीवर प्रशासन सतर्क होम टू होम तपासणी बरोबर विविध उपाययोजना सुरु-सभापती विक्रम शिरसट

पंढरपूर/नामदेव लकडे -पंढरपूर शहरातील अतिशय दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या गोविंदपुरा,लखूबाई झोपडपट्टी परिसर, रामबाग परिसर या भागात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने नगर पालिका प्रशासन सतर्क झाले असून मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच सभापती विक्रम शिरसट यांनी या परिसरात विविध ठिकाणी भेटी देऊन आवश्यक उपायोजना,थर्मल स्कॅनिंग,तसेच प्रतिबंधात्मक फवारणी आदींची पाहणी केली. या बाबत सभापती विक्रम शिरसट यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जूनच्या आसपास गोविंदपुरा भागात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्या नंतर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले अनेकजण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.त्यामुळे प्रशासन अलर्ट होत तातडीने येथे प्रतिबंधात्मक झोन तयार करण्यात आले होते.रामबाग रोड व जुनी पेठ परिसरातही असाच प्रकार आढळून आला होता.पुढे या पैकी बहुतांश रुग्ण बरे होऊन घरीही परतले होते. मात्र आता पुन्हा या भागात रुग्ण आढळून येऊ लागल्याने आम्ही दक्षतेने विविध उपाययोजना करीत आहोत.

Leave a Reply