Breaking News

गुळपोळी येथे रक्तदान शिबीरात महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद

  बार्शी /अब्दुल शेख – कै.सुखदेव शिवाजी चिकणे यांच्या 21 व्या  पुण्य स्मरण निमित्त व कोवीड 19 च्या महामारी ने रक्ताचा तुटवडा आहे ,या निम्मीत्ताने गूळपोळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबिराचे आयोजन  भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय गुळपोळी ,भैरवनाथ ग्रामीण पतसंस्था गुळपोळी, नेहरू युवती मंडळ गुळपोळी,नेहरू युवा मंडळ गुळपोळी,भैरवनाथ ग्रामविकास मंडळ गुळपोळी,शिवतेज मंडळ गुळपोळी  यांच्या वतीने करण्यात आले होते.  या रक्तदान शिबीराचे उदघाटन सुर्डी ग्रामपंचायतीचे  सदस्य धिरज श्रीरंग डोईफोडे व जी एस टेलर चे संचालक गुलाब हुसेन शेख  यांचे हस्ते करण्यात आले. सदर रक्तदान शिबीर मध्ये महिलांनी  उत्साहित होउन स्वयंस्फुरतीने रक्तदान केले. या शिबीरात 32 रक्तदाते यांनी रक्तदान केले.शिबीरामध्ये रक्तदाते यांना विस लिटर थंड पाणी ठेवणयाचा जार चा भेट म्हणुन देण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थिति अक्षय चंद्रकांत सावंत ,सुनिता चिकणे , सौरभ कापसे , राजेंद्र गोरे , गणेश लंगोटे प्रहार संघटना उपाध्यक्ष बार्शी तालुका व पोलीस पाटिल बाळकृष्ण पिसे , अतुल चिकणे , शिवाजी चिकणे मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे व विविध मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.  विक्रांत बाळराजे राजन पाटील यांनी सदर कार्यक्रमासाठी फोन वरून शुभेच्छा दिल्या ,अशी माहिती सूर्यकांत चिकणे यांनी दिली. कार्यक्रम पार पाडण्यासाठी बाबू विठ्ठल चिकणे व अक्षय चंद्रकांत सावंत सौरभ कापसे ,  बाळू रावसाहेब चौधरी , सिध्देशवर माळी , सुरज पवार , माधवी मिरा पवार , सौ आरे मॅडम  यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!