Breaking News

गावात सामाजिक उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करा -सपोनि सुधीर तोरडमल

प्रतींनिधी / आसिफ मुलाणी – देशावर आणि राज्यावर असलेल कोरोनाचे संकट यामुळे राज्य सरकारने गणेश उत्सव अतिशय साध्या  पद्धतीने साजरा करण्याचे आहे. याच पार्श्वभूमीवर पांगरी पोलिस स्टेशन चे  सहायक पोलिस निरीक्षक यांनी गणेश मंडळांना गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून गावात सामाजिक उपक्रम राबवा , असे आवाहन कारी येथे बोलताना केले. यावेळी त्यांनी आपल्या गावात कोरोना येणार नाही यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करा तसेच पांगरी पोलिस स्टेशन हद्दीतील इतर गावामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी पांगरी पोलिस स्टेशन चे कोठावळे सर , गावाचे सरपंच , उपसरपंच ,पोलिस पाटील , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ,ग्रामपंचायत सदस्य तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!