गाळ मिश्रीत पाणीपुरवठा, ग्राम विकास अधिकारी यांना निवेदनमंगळवेढा /अमीर आत्ताऱ – मंगळवेढा तालुक्यातील मौजे हुलजंती येते गाळ मिश्रीत पाणी येत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची भीती असल्याचे लेखी निवेदन. जन कल्याण फाउंडेशन च्या वतीने ग्रामपंचायत हुलजंती यांना लेखी निवेदनात पुढे म्हणाले की सध्या कोरोना महामारी चा काळ चालू आहे . 

नळाला येणारे पाणी गाळ मिश्रीत पिवळसर  येत आहे व पाण्यातून दुर्गंधी येत आहे व पाण्यातून  दुर्गंधी येते आहे तसेच हुलजंती गावामध्ये एकूण पाच प्रभाग आहेत  गावामध्ये साधारण आठ ते नऊ हजार लोकसंख्या  आहे  गावातील बऱ्याच प्रभागातील गटारी बुजल्या असून. तब्बल 10 वर्षे झाले  गटारे काढलेल्या नाहीत . 

स्वच्छ भारत अभियानाच्या हुलजंती गावांमध्ये  बोजवारा उडालेला दिसून येतोय 


तसेच सार्वजनिक दिवाबत्ती दिवसा चालू असून रात्रीच्या वेळी गरजेचे असताना बंद असतात . गावात जागोजागी कमरे इतके गवत  उगवली असून   असे निवेदनात म्हटले आहे  निवेदनानंतर तरी प्रशासन या समस्येकडे लक्ष देणार आहे का असा सवाल गावातील नागरिकांकडून . जनकल्याण फाउंडेशन . व्यक्त करण्यात येत आहे. 

Leave a Reply