गरीब व गरजूंना रेशन वाटप

उस्मानाबाद/पुरूषोत्तम बेले – जानेवारी महिन्यापासून देशासह राज्यात कोरोणा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा धोकादायक परिस्थिती मध्ये तुळजापूर व लोहारा तालुक्यातील गावांना मदतकार्य करण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी म्हणून सिमेंन्स गमेंसा व सेवावर्धीनी पुणे या दोन संस्थाच्या पुढाकाराने १५ गावांमध्ये प्रत्येक गावात १५ रेषण कीट व १०० मास्क, सॅनिटाइजर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना हँन्डग्लोवज, इत्यादी साहित्य शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मोफत वाटप करण्यात आले हे साहित्य वाटप करण्यासाठी, प्रमुख पाहुणे म्हणून सिमेंन्स गमेंसा चे साइट इंचार्ज व सेवावर्धीनी चे मारूती पांचाळ राष्ट्रीय युवा स्वंयसेवक पुरूषोत्तम बेले , हिप्परगा ग्रामपंचायत सदस्य धर्मवीर जाधव, किरण चिंचोले, संतोष गायकवाड, विकास लांडगे, आण्णासाहेब तरंगे, जयश्री बिराजदार, किशोर होणाजे, आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply