कौठाळीत कोरोनावर मात केलेल्या देवा गोडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

पंढरपूर/नामदेव लकडे – ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कौठाळीच्या तलाठी कार्यालयात स्वतंत्र भारताचा सन्मान करत ध्वजारोहण करण्यात आले.सदर कार्यक्रमात नुकतेच कोरोनावर मात कोरोनामुक्त झालेला कौठाळीचा युवक व गृहरक्षक दलाचा जवान विश्वनाथ उर्फ देवा गोरख गोडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना देवा गोडसे यांनी सांगितले की कोरोना संसर्ग या आजाराला न घाबरता सामोरे जा. वेळीच उपचार घ्या, सर्दी, ताप, खोकला, खशात खवखवणे ई. लक्षणे जाणवताच डॉक्टरांंशी संपर्क साधा व कोरोना संसर्गापासून  दूर राहण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा, मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवा, अत्यावश्यक काम असेल तरच घरातून बाहेर पडा असे त्यांनी सांगितले.
यावेळी कौठाळीचे सरपंच शंभर गोडसे, माजी सरपंच महादेव गाढवे, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब धुमाळ, जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, पोलीस मित्र सागर गोडसे,तलाठी अब्दुल चाँदकोटे, आरोग्य सेवक धनाजी मस्के, आरोग्य सेविका शिवगंगा काकडे व कौठाळीच्या महिला पोलीस पाटील माधुरी नागटिळक उपस्थित होत्या.

Leave a Reply