कोविड रुग्णालयासाठी आ.भारत भालकेंनी दिला‌ ३० लाखांचा निधी

पंढरपूर / नामदेव लकडे ::-पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.  यावर नियंञण मिळवण्यासाठी  गुरुवारी  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी पंढरपूर मध्ये आढावा बैठक घेतली.या बैठकीत आ भारत भालके यांनी १२ आॅक्सिजन मशिन खरेदी करणेसाठी ३० लाखांचा निधी  दिला. पंढरपूर शहर व तालुक्यात दररोज वाढणारे रुग्ण चिंताजनक आहेत. 
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर मध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. याची घोषणा शुक्रवारी जिल्हाधिकारी   करणार आहेत. सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी  शहरातील सहा खाजगी हास्पिटल ताब्यात घेण्यात आले आहेत.  या रुग्णांवर तात्काळ उपचार मिळणेसाठी व मृत्यु दर कमी करणेसाठी  आॅक्सिजन मशिनची गरज असल्याचे या बैठकीत डाॅक्टरांनी सांगितले. यावर तात्काळ आ भारत भालके यांनी ३० लाखांचा निधी दिला. याचबरोबर या बैठकीत आ भालके यांनी आरोग्यमंञी राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधत रॅपिड किटससह इतर आरोग्य किट देण्याची मागणी केली.
यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले,  उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ जयश्री ढवळे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पो नि प्रशांत भस्मे, पो नि अरुण पवार, पो नि किरण अवचर यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply