Headlines

कोर्ट फेम अभिनेते विरा साथीदार यांचे निधन


महाराष्ट्रातील विचारवंत , लेखक , अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन झाले.  एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे व्यक्ती अशी त्यांची ओळख होती.


राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोर्ट या मराठी सिनेमात मुख्य भूमिका खूप गाजली होती. भारताकडून  ऑक्सरसाठी सुद्धा या सिनेमाला नामांकित करण्यात आले होते. सर्वश्रेष्ठ परदेशी भाषेतील सिनेमा यासाठी कुठला नामांकन देण्यात आले होते. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.वीरा साथीदार विद्रोही या मराठी मासिकाचे संपादक होते. तसेच मानवी हक्क कार्यकर्ते अशी देखील त्यांची ओळख होती.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोर्ट या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारे आंबेडकर चळवळीतील गीतकार , पत्रकार व विचारवंत वीरा साक्षीदार यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. नागपुरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनयाची छाप पाडणाऱ्या या महान कलावंतास विनम्र श्रद्धांजली.  – श्री. नितीन राऊत , ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *