कोरोना साथीच्या काळात भावनिक मनोबल वाढीसाठी मानस मैत्र हेल्पलाइन

  

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा , परिवर्तन संस्था व इतर संस्थाचा  उपक्रम

बार्शी /प्रतिनिधी –कोरोनाची रुग्णसंख्या देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे एका वर्षांनंतर ही समाज धास्तावलेला आहे. माध्यमांमधून जगभरातील कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या  बातम्या येत आहेत. कोरोनाचा शरीरावर तसेच मानसिक आरोग्यावर  परिणाम होत आहे. लोकांना   मानसिक आधार व भावनिक प्रथमोपचार मिळावा  यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा , परिवर्तन संस्था व इतर संस्थाचा  यांच्या वतीने मानस मैत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

समाजातील काही लोक कुटुंबापासून दूर आहेत. अशा वेळी कोणाशीही  प्रत्यक्ष भेट न होणे,हे तणावाचे कारण असू शकते. कोरोना बाबत समाजमाध्यमातून उलट –सुलट माहिती पसरते आहे. अंत्यविधीच्या बातम्या भडक स्वरुपात सोशल मीडिया व टेलिव्हिजनच्या  माध्यमातून प्रसारित होत आहेत.या सर्वांमुळे लोकांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्याला नेमका कशामुळे संसर्ग होऊ शकतो,काय केल्याने आपण कोरोना पासून स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकतो.असे विचार व्यक्तीला त्रास देऊ शकतात.

ह्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा , परिवर्तन संस्था व इतर संस्थाचा कार्यकर्त्यांनी एकत्र येत मनोबल हेल्पलाइन हा उपक्रम सूरु केला आहे.वीस पेक्षा जास्त प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणी यांच्या माध्यमातून ही हेल्पलाइन चालवली जाणार आहे. कोरोनामुळे ज्यांनाअस्वस्थता ,भीती ,निराशा वाटत असेल अशा लोकांना भावनिक आधार आणि समुपदेशन या हेल्पलाइन च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ज्यांना मनमोकळे करण्याची ,आधाराची गरज वाटते अशा लोकांनी हेल्पलाइन फोन करावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बार्शीच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती बार्शी शाखेचे कार्याध्यक्ष  प्रा.डॉ.अशोक कदम व सचिव विनायक माळी यांनी दिली. 

हेल्पलाइन विषयी ..

मराठी व हिंदी भाषेतून सेवा पुरवली जाईल.

महाराष्ट्रातील व महाराष्ट्राता बाहेरील लोकांना याचा लाभ घेता येणार.

ही सेवा पूर्णपाने मोफत असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.


ह्या क्रमांकावर करा संपर्क –

गोविंद पाटील – 9822955059

रंजना गवांदे – 9850491611

कृष्णात स्वाती – 8600230660

निशा भोसले – 9764476476 

Leave a Reply