कोरोना रुग्णांच्या मदती सरसावला सलमान , ही केली घोषणा..

 

गरजू कोरोना रुग्णांना मोफत  ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देणारं सलमान खान 

मुबई/वृत्तसंस्था – बॉलीवूड दबंग स्टार सलमान खान गरजू कोरोना रुग्णांना मोफत  ऑक्सिजन कंसंट्रेटर्स देणारं आहे.

कोरोना महामारी ने देशात हाहाकार माजवला आहे. अशा कठीण काळात अनेक बॉलीवूड आणि टीव्ही कलाकार लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अशातच सलमान खान कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

सलामन ने 500 ऑक्सिजन कंसंट्रेटर्स ऑर्डर दिली आहे. दिसेन सिद्दिकी द्वारा इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या एका फोटोला सलमान री-पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

फोटोमध्ये खूप सारे ऑक्सिजन कंसंट्रेटर्स दिसत आहेत त्यामध्ये दोन व्यक्ती आपसात बोलताना दिसत आहेत. 500 ऑक्सिजन कंसंट्रेटर्स मुंबई ला पोहोचले आहेत.

सलमानने फोटो शेअर करत लिहिले आहे की हे ऑक्सिजन कंसंट्रेटर्स फ्री मध्ये दिले जाणार असून वापरानंतर माघारी द्यावेत. त्यासोबतच सलमानने हेल्पलाइन नंबर शेअर केला आहे

Leave a Reply