Headlines

कोरोना महायोद्धा पुरस्काराने डॉ मस्के सन्मानित


सोलापूर/अमीर आत्तार – जगात देशात महाराष्ट्र राज्यात कोरोना या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असून त्याचे मोठया प्रमाणात पडसाद सोलापूर शहर व जिल्ह्यात उमटले असून याच कोरोना काळात आपले कुटुंब बाजूला ठेवून व स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो लोकांचे प्राण वाचवणारे देवदूत सिव्हिल हॉस्पिटल मधील वैधकीय अधीक्षक डॉ मस्के यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्यस्तरीय कोरोना महायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांच्याहस्ते सन्मान पत्र व पुष्पगुछ देऊन व पेढे भरवून भव्य सत्कार करण्यात आला. 

कोरोना बाबत अतिशय उत्तम काम करून शेकडो लोकांचे प्राण वाचवून योग्य उपचार करून कोरोना सारखी भयानक परिस्थिती योग्य प्रकारे हाताळणारे डॉ मस्के म्हणजे माणसातील देव अशी उपमा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रतिपादन केले आहे. 

या सत्काराला उत्तर देताना डॉ मस्के यांनी कोरोना सारख्या जीवघेण्या आजारा सिव्हिल हॉस्पिटल वर पडलेला प्रचंड ताण व अतिशय नियोजन पणे हाताळलेले परिस्थिती या बाबत माहिती देऊन पत्रकार सुरक्षा समितीचे आभार मानले . 

यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी डॉ रवींद्र सोरटे, अक्षय बबलाद, मल्लिनाथ गोरे, इम्तियाज अक्कलकोटे, मुस्ताक कारभारी, सतीश गडकरी, राकेश वरम, बिपीन दिड्डी, अशोक माचन, बालाजी कुणी, प्रदीप पेंदापल्लीवार, इस्माईल शेख, अशोक मोची, भीमाशंकर बिरूनगी, आन्सर तांबोळी, नागेश गाजूल, लक्ष्मण गणपा, बाबा काशीद, रवी विटकर, श्रीकांत विटकर, अण्णा धोत्रे, हरिदास भिसे, अमर पवार, ज्ञानेश्वर गवळी, बंडू तोडकर, पिंटू कपडेकर, संभाजी गोसावी, इम्रान सगरी, आरिफ शेख, भास्कर माचन योजना कामतकर, संतोष सालटे इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *