कोरोनाशी युद्ध करण्यासाठी बेलदार समाजाने दिले 51 बाटल्या रक्त

बार्शी- बेलदार समाज बांधवांच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने  20 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 51 बाटल्या रक्त जमा झाले. कोरोनाशी युद्ध करण्याचा मानस ठेवून रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.  रक्तदानाच्या उद्घघाटनासाठी कामगार नेते कॉम्रेड तानाजी ठोंबरे हे उपस्थित होते. हा कार्यक्रम बेलदार समाजाचे अध्यक्ष प्रेम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.  

यावेळी मंचावर संतोष मोहिते, परमेश्वर पवार, शिवराम जाधव, अनिरुद्ध नखाते, प्रवीण मस्तुद उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम मोहिते, बालाजी मोहिते, सागर पवार, अजय मोहिते, सचिन पवार, सोमनाथ मोहिते, चंद्रकांत जाधव, नवनाथ मोहिते, संभाजी मोहिते, कृष्णा मोहिते, मोहन मोहिते, महेश जाधव, नारायण पवार, संदीप पवार, शशिकांत पवार, सागर शिरसागर, अजय हाके, श्रीकांत जाधव, राहुल मोहिते, स्वप्नील पवार, बंडू साळुंखे आदींनी कष्ट घेतले.

Leave a Reply