AarogyaBreaking News

कोरोनाची लक्षणे असणारा पंढरपूर गांधीरोडचा पहिला बळी – पंढरपूर न.पा.प्रशासनाने केले अंत्यसंस्कार

पंढरपूर/प्रतिनिधी ::-पंढरपूर तालुका व पंढरपूर शहरातील आज पर्यंत एकूण 35 कोरोना बाधीत रुग्ण सापडले असून यापैकी सध्या पंढरपूर येथील एम आय टी कोवीड सेंटर वाखरी येथे 20 रुग्ण उपचार घेत असून यातील 6 जण कोरोना बाधीत सोलापूर येथे उपचार घेत आहेतर 1 जणांवर पुणे येथे उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले यांनी माहिती दिली आहे.

आज सकाळी नव्याने पाच कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असून सध्या पंढरपूर शहराचा मध्यवर्ती असणारा भाग म्हणजे येथील गांधी रोड याठिकाणचा एक व्यक्ती कोरोनाची लक्षणे असल्याने सदर व्यक्तीस आज सकाळी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते त्या वेळी सदर रुग्णाची कोरोना संशयित लक्षणे असल्याने त्याचा याठिकाणी कोरोना चाचणी टेस्टसाठी स्वँब घेण्यात आला होता परंतु काही तासांनी सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याने पंढरपूर शहरामध्ये संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे परंतु त्याचा कोरोना चाचणी टेस्ट स्वँब जर पॉझिटिव्ह आला तर तो कोरोनाचा पंढरपूर शहरातील पहिला बळी ठरणार आहे. त्यामुळे सदर व्यक्तीच्या कुटुंबातील 22 लोकांना होम क्वारंटाईन केले आसून आता त्यांचीही टेस्ट करावी लागणार आहे.सदर मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याने अनेकांचा संशय बळावला असून सध्या शहर व तालुक्यात चर्चा जोराने सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!