कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निम्मीताने भव्य ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा


बार्शी /अब्दुल शेख – लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतीने भव्य प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र स्पर्धेचे आयोजन केले आल्याची माहिती काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांनी दिली आहे.  

कोविड 19 या महामारी मुळे, ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली गेली आहे.  काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन, कार्य, विचार, साहित्यावर प्रकाश पडावा, अण्णा भाऊंचे विचार नव्या पिढी पर्यंत जावेत, प्रबोधन व्हावे या उद्देशाने ऑनलाईन भव्य प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र स्पर्धा केली आहे. या प्रश्नमंजुषेत 25 प्रश्न 100 गुणांसाठी दिले आहेत. https://forms.gle/g18mXmoxrr9tmkG67 या लिंक वर जावून या स्पर्धेत  पुरोगामी पक्ष, चळवळीचे कार्यकर्ते, तरूण, विद्यार्थी, महिला, नागरिक यांनी या स्पर्धेस उदंड प्रतिसाद द्यावा असे अवाहण केले आहे.   
स्पर्धेत सहभागी होणार्यांना प्रत्येक सहभागीस ऑनलाईल मेल आयडीवर सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे तसेच स्पर्धेतील विजेत्यांचा कोरोनानंतर सत्कार करण्याचा, बक्षीस देण्याचा आयोजकांचा मानस आहे.अशी माहिती कॉ.प्रवीण मस्तुद यांनी दिली.  


   

Leave a Reply