Breaking NewsPolitics

कॉंग्रेस अल्पसंख्यांक कमिटीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षापदी वसिम पठाण यांची निवड

प्रतिनिधी / बार्शी- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाअंतर्गत काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या  आदेशानुसार सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी वसीम पठाण यांना अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नदीम मुजावर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शहाजी सावंत तसेच राजेंद्र वालीया पुणे शहर अध्यक्ष शहाबुद्दीन शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढील काळात काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व लोकहिताच्या दृष्टिकोनातून समाजाच्या सर्व स्तरातील व विशेषतः तळागाळातील शेवटच्या माणसापर्यन्त काँग्रेस पक्ष वाढवण्याचे तसेच अल्पसंख्याकाचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम पदाच्या माध्यमातून करणार असल्याचे वसीम पठाण यांनी सांगितले.तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील बार्शी काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश पाचकुडवे बार्शी शहराध्यक्ष ऍड.जीवनदत्त आरगडे बार्शी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल मस्के यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!