Headlines

कॅनरा बॅंकेच्या गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेड करणार बोंबाबोंब आंदोलन

शेतकरी सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात

पंढरपूर/रवीशंकर जमदाडे – खेडभाळवणी येथील काही शेतकरी यांनी मे.2018 मध्ये दिड लाखाच्या आत कॅनरा बॅंक पंढरपूर यांचे पिक कर्ज घेतलं होते.सदर शेतकरी हे भिमा नदी पुरग्रस्त भागात क्षेत्रात येतात. परंतु दि.30 मार्च 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत सदर शेतकरी थकीत कर्जदार असल्याने त्यांना महात्मा जोतिराव फुले कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला नाही.कॅनरा बॅंकेचे मनमानी व गहाळ कारभारामुळे त्यांनी या शेतकर्यांची कर्ज खात्याची माहिती शासनास सादर केली नाही. ह्या सगळ्या घटनांची जबाबदारी बॅंकेची असताना सुद्धा अधिकारी उडवा-उडवीची ऊत्तरे देत आहेत. त्यामुळे सदर शेतकरी यांना नविन कर्ज घेण्यासाठी अडचणी येत आहेत.वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही सदर शेतकरी यांना न्याय मिळत नसल्याने येत्या शुक्रवारी दि.13/11/2020 रोजी संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने शेतकर्यांना व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन स.11 वा. कॅनरा बॅंके समोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे तालुका -अध्यक्ष..शिवश्री.बाळासाहेब बागल, सोलापूर जिल्हा संघटक- शिवश्री.प्रमोद जगदाळे,तावशीचे अध्यक्ष शिवश्री.अमोल कुंभार यांनी शेतकर्यांना सोबत घेऊन बॅंकेचे अधिकारी व सहाय्यक निबंधक पंढरपूर यांना दिले आहे.

Leave a Reply