Breaking News

कुंडल येथे वाढीव वीज बिलांची होळी

प्रतींनिधी – कुंडल येथिल महावितरण कार्यालयावर रणसंग्राम सोशल फौंडेशनच्या वतीने विद्युत कायदा अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते श्रीदास होनमाने यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीज बिलाबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन  दिले. यावेळी वाढीव लाईट बिलाची होळी करण्यात आली.

गेल्या काही महिन्यापासून महापूर,अवकाळीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यातून शेतकरी कसाबसा सावरतोय तोपर्यंत कोरोना महामारीला  तोंड देत असताना व जनता तीन महिने पूर्ण घरी बसली असताना लगेच चौथ्या महिना संपायच्या अगोदरच ग्राहकांच्या समोर महावितरणने वीज बिलाची अव्वाच्या सव्वा बिले दिली आहेत .

एकीकडे  विज बिल वाढत असताना शेतकरी आणि वीज ग्राहक संकटात असताना इंधन आकार सर्व आकार, स्थिर आकार वीज आकार, वहन आकार, वीज शुल्क, वीज विक्रीकर, व व्याज अशांची एकदम वाढ करून जनतेला संभ्रमात टाकले. शेतकऱ्यांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना गरीब जनता तडफडत असताना 2003 कलम (56)नुसार महावितरण च्या नियमानुसार ज्या मिटर चे रिडींग घेतले नाही. असे बिल अनिवार्य नाही, असा त्यांचाच कायदा नियमात आणून 3 महिन्याची वीज बिले माफ व्हावीत.अशी मागणी रणसंग्राम सोशल फौंडेशन कुंडल च्या वतीने अँड दीपक लाड यांनी केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रावळ यांनी आक्रमक भूमिका घेत या विषयाची तीव्रता मुख्यमंत्री महोदयापर्यतं लवकर पोचवून सर्व  लाईट बिल माफ करण्यासाठी महावितरण ने ठोस लवकर  प्रयत्न करावेत.
अशी मागणी केली. कुंडल येथिल मुख्य चौकात  महावितरण वाढीव बिलाची होळी करण्यात आली,
जर वीज ग्राहकांना दाद मिळाली नाही, तसेच विटा डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांनी चुकीची वीज बिले भरू नयेत, तसेच चुकीची वीज बिले भरून घेण्यास महावितरण ने तगादा लावल्यास व वीज बिल  दुरुस्त करून देण्यास नकार दिल्यास, तीव्र स्वरूपात आंदोलन करू, व जिल्हाभर वीज ग्राहकांच्या हक्कासाठी लढा उभा करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व महावितरण चे अभ्यासक श्रीदास होनमाने यांनी कुंडल येथे दिला..

यावेळी पोपटराव सूर्यवंशी,विष्णू बंडगर, डॉ अनिल पुजारी, प्राणीमित्र डॉ जमीर नदाफ, बाबुराव शिंदे, शांताराम वेल्हाळ, तुलसीदास खारगे, तुकाराम खारगे, शहाजी चव्हाण, आशिष पाटील, राणा कांबळे, अक्षय कांबळे, सचिन शिंदे, विजय होनमाने सह वीज ग्राहक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!