Breaking News

कुंडल येथे दिव्यांग बालकांना अर्सेनिक अल्बम व खाऊ वाटप राज्यमंत्री बच्चू कडूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम

सांगली – कुंडल येथिल  रणसंग्राम सोशल फौंडेशन यांच्या  वतीने कुंडल येथिल दिव्यांग बालकांना खाऊ व  अर्सेनिक अल्बम रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाऱ्या औषधाचे वाटप करण्यात आले.दिव्यांग बंधू हे समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहेत, त्यांचा सन्मान वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या आई वडिलांना दिव्यांग पाल्यांच आदर्शवत संगोपन केल्याबद्दल  सलाम करण्यासाठी रणसंग्राम नेहमीच तत्पर असल्याचे शिवाजी रावळ यांनी कळविले.यावेळी रणसंग्राम चे अध्यक्ष अँड दिपक लाड, मार्गदर्शक पोपटराव सूर्यवंशी, संघटक शिवाजी रावळ, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील गुरव,, राजेंद्र सूर्यवंशी सर, धुमाळ सर, दिव्यांग प्रोजेक्ट चालक सौ कुंभार मॅडम, सौ कासार मॅडम, संगीता परळे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!