Headlines

कुंडल येथिल शेतमजूर वसाहतीच्या समस्या आणि प्रश्नाबाबत रणसंग्राम कडून पाठपुरावा

सांगली – कुंडल येथिल क्रांतिअग्रणी डॉ जी. डी बापू लाड नगर शेतमजूर वसाहतीमधील नागरिकांनी संपर्क केल्याने आज रणसंग्राम सोशल फॉउंडेशन चे अध्यक्ष अँड दिपक लाड व सदस्यांनी या भागाची पाहणी केली, यावेळी नागरिकांनी त्यांच्या समस्या पोटतिडकीने सांगितल्या..पाहणी दरम्यान वसाहतीमधील लोक मूलभूत सुविधा पासून वंचित असल्याचे दिसून आले.पावसाळा सुरु असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल,दलदल निर्माण झाली आहे, तात्पुरती रस्त्याची समस्या, सुटण्याकरिता वसाहतीमधील रस्त्यावर मुरूम टाकून मिळावा अशी मागणी सर्रास नागरिकांच्या मधून करण्यात आली, 
याबाबत मागणीचे निवेदन कुंडल ग्रामपंचायतकडे देण्यात आले, यावेळी उपसरपंच माणिक दादा पवार, ग्रामसेवक कुलकर्णीसो उपस्थित होते. वसाहतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन चे काम चालु आहे, परंतु सध्या पाऊस असल्यामुळे हे काम थांबले असल्याचे समजले,सांडपाणी व्यवस्थापणासाठी काढलेल्या खड्यात पाऊसाचे पाणी साठल्याने काढण्यात आलेल्या खड्यामध्ये काठोकाठ पाणी जमा झाले आहे,
 रस्ते व गटार काम चालु होते, रस्ते व गटार अर्ध्या भागात पूर्ण झाले आहेत.उर्वरित भागातील रस्ते व गटार पूर्ण करावी, विलंब झाला  तर या भागात अस्वच्छतेमुळे, ढासांचे प्रमाण वाढून रोगराई व साथीच्या आजराची शकयता नाकारता येत येत नाही,
सांडपाणी व्यवस्थापनासाठी काढण्यात आलेल्या खड्यामुळे लहान मुलांना धोक निर्माण झाला असून याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे असल्याचे येथिल नागरिकांनी कळवत, सांडपाणी व्यवस्थापण यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.वसाहतीमध्ये वीज व्यवस्था नाही, शालेय विध्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन कराव लागतो,लाईट विना अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशाने मुले अभ्यास करत आहेत.
यावेळी संघटक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रावळ, हनीफ शेख, महादेव  कुकडे,रोहित सोरटे, अक्षय बारबोले, सुरज गेजगे, कुमार जावीर, विजय होणमाने, शुभम गेजगे सह महिला व  नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *