AarogyaBreaking News

किनगावराजात बेबी केअर किटचे वाटप

 

प्रतिनिधि/ गजाजन आघाव – किनगावराजात बेबी केअर किटचे वाटप महिलांनाबेबी केअर किटचे वाटपकरतांना अंगणवाडी सेविका  एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत येथील अंगणवाडी क्रमांक ५ येथील अंगणवाडी सेविका , मदतनीस व आशा स्वयंसेविकाच्या हस्ते महिलांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले . यावेळी अंगणवाडी सेविका सौ.शीतल अजय जाधव , मदतनीस सौ.रेखा गजानन बलटे , आशा स्वयंसेविका सौ.जयश्री मालोजी जाधव , सौ.मीराअंबादास हरकळ यांनी स्तनदा माता उमेश रवी कुटे यांच्या नवजात बालकासाठी बेबी केअर किटचे वाटप केले . एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यात अशा एकूण ८८७ किट प्राप्त झाल्या असून किनगावराजा येथील सहा अंगणवाडी केंद्रात प्रत्येकी चार अशा २४ किट प्राप्त झाल्या आहेत . ग्रामीण भागातील नवजात बालकांचे संगोपन व्यवस्थित व्हावे तसेच स्वच्छता बाळगण्यासाठी या हेतूने या किटचे मोफत वितरण शासनामार्फत होत असते .

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!