Breaking NewsPolitics

काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने ऑनलाईन व्याख्याने

बार्शी /अब्दुल शेख  – आयटक संलग्न बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 23 व 24 जूलै 2020 रोजी काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या 100 जयंती निमित्ताने झूम मिट ॲप वर ऑनलाईन व्याख्याने झाली.  यामध्ये आयटक व बांधकामगारांची भूमिका या विषयावर काॅम्रेड शंकर पुजारी, बांधकाम कामगार राज्य फेडरेशन, सांगली व  काॅम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे विचार व कामगार चळवळ या विषयावर काॅम्रेड प्रविण मस्तुद, सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौन्सिल यांचे काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने हि व्याख्याने झाली.

बांधकाम कामगारावरील व्याख्यानात कॉम्रेड शंकर पुजारी म्हणाले, बांधकामगारांची लाॅकडाउन काळात परस्थिती तिव्र झाली आहे, सरकाकडे करोडो रूपये पडून आहेत परंतू सरकार ते कामगारांना द्यायला तयार नाही, 10 हजार रूपयांची मागणी असताना 2 हजार रूपये मिळाले, पुढील काळात बांधकाम कामगारांच्या पेंन्शन, घरकूलासाठी, आरोग्यासाठी आयटक तिव्र लढा करेल.
काॅम्रेड अण्णा भाऊ साठें वरील व्याख्यानात काॅम्रेड प्रविण मस्तुद म्हणाले, कॉम्रेड अण्णा भाऊंचा संघर्ष हा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय समतेसाठी होता,  मार्क्स – वादावर निष्ठा ठेवत संपूर्ण हयात कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काम केले. साहित्यीक, शाहिर, कलावंत, कथाकार, लोकनाट्याचे जनक असणार्‍या  अण्णा भाऊंनी त्यांच्या सहित्यातून अन्याय्या विरूध्द लढणारे नायक – नाईका उभ्या केल्या ज्यांनी जात, रूढी परंपरा यांना फाटा दिला.  स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राचा रणसंग्राम यात लढणारे अण्णा भाऊ कामगारांना लढ्याची दिशा देतात.  आजच्या परस्थितीत निर्माण झालेल्या प्रश्नांवर कामगारांनी अण्णा भाऊ सांगितल्या प्रमाणे मार्क्सवादी विचाराने  लढावे लागेल.
व्याख्यान यशस्वी करण्यासाठी बांधकाम संघटना सचिव काॅम्रेड अनिरूध्द नकाते, काॅम्रेड ए.बी. कुलकर्णी, काॅ. शाफीन बागवान, काॅ. बालाजी शितोळे, काॅ. पवन आहिरे, संतोश मोहिते, आनंद धोत्रे, भारत माळी, शिवाजी पवार, रमेश पालखे, चांद शेख यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!