Headlines

कासारवाडी रोड जवळील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून केला शेतरस्ता

बार्शी/प्रतिनिधी – स्वखर्चातून व लोकवर्गणी गोळा करून तसेच स्वतःच्या शेतातील पाच पाच फूट जमीन देऊन कासारवाडी रोड परिसरातील शेतकऱ्यांनी एक किलोमिटर लांबीचा रस्ता तयार केला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की कासारवाडी रोड भागातील शेतकऱ्यांच्या शेतामधुन लातूर मुंबई रेल्वे लाईन गेल्याने पूर्वापार चालत आलेले रस्ते बंद झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी जाणे- येणे अवघड झाले होते. त्यामुळे रस्त्यामुळे काही प्रमाणात कलह निर्माण झाले होते.


कासारवाडी रोड भागात शेती व शेतकरी प्रभाकर बारबोले यांनी सर्व शेतकऱ्यांना वाटेचे महत्त्व पटवून दिले. होय नाही म्हणत अखेर सर्व शेतकऱ्यांनी खर्चातून लोकवर्गणीतून पैसे गोळा केले. स्वतःच्या शेतातील ५ – ५ फूट जमीन दिली.


शेतकऱ्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये लोकवर्गणी जमा करून सुमारे दोनशे टीपर दगड मुरूम टाकून १ किलोमीटर लांबीचा रस्ता शेतीकामासाठी स्वखर्चातून तयार केला. या कामासाठी या भागातील शेतकरी प्रभाकर बारबोले, हनुमंत ताटे , प्रसाद मनगिरे , बजरंग नरुटे , केदार कुरंडे , अनिल राउत, उल्हास माने, हनिफ मुल्ला आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेत सुमारे एक लाख 90 हजार रुपयांची वर्गणी जमा केली. शेतीसाठी कायम रस्ता तयार केला.शेतरस्त्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply