कामागरांच्या अनुदानाचे अर्ज हातगाडी वरून ओढत नेत कॉम्रेड आडम मास्तरांनी केले अनोखे आंदोलन

अनुदानाचा निर्णय न झाल्यास 9 ऑगस्ट ला 1लाख कामगारांचा आक्रोश मोर्चा

सोलापूर – साडे एकवीस लाख कोटी चे पॅकेज सरकार ने जाहीर केले.त्यात उद्योजकांच्या कर्जासाठी साडे अकरा लाख कोटी राखून ठेवले.भांडवलदारांचे साडेसात लाख कोटी कर्जमाफी केली.तर कामगारांसाठी साडेतीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली.जनधनच्या नावाने फक्त 500 रुपयांची मदत दिली.ही विसंगती आम्हाला मान्य नाही. इंधन दरवाढीतुन 18 लाख कोटी रुपयांची कमाई करून केंद्र सरकारने आपली तिजोरी भरलेली आहे. लोकांची क्रयशक्तीच नसेल तर बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेला गती कशी प्राप्त होईल ? त्यासाठी केंद्र सरकारने आयकर लागू नसणाऱ्यांना दरमहा सात हजार पाचशे रुपये आर्थिक मदत आणि माणसी 10 किलो मोफत रास्त अन्नधान्य आणि राज्य सरकारने टाळेबंदी च्या कालावधीतील उदरनिर्वाहासाठी 10 हजार रुपये रोख रक्कमेची मागणी केलेल्या अर्जदारांना द्यावे, जर 9 ऑगस्ट च्या आत याचा निर्णय नाही झाल्यास 1 लाख कामगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला.
आक्रोश मोर्चात बोलताना आडम मास्तर म्हणाले की, राज्य सरकार उद्योजकांना व कारखानदारांना 2002 पासून दर वर्षाला एक ते दिड हजार कोटी रुपयांची सवलत देऊन एका युनिटला 1 रुपये पंचवीस पैसे आकारणी करतात.मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही.कामगार भुकेकंगाल होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असेही ते म्हणाले. केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने 3 जुलै हा दिवस मागणी दिन पाळण्याची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने सोलापूरात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली सिटू चे राज्य महासचिव अँड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील विडी, यंत्रमाग, घरेलू, रेडिमेड व शिलाई, ऑटो रिक्षा चालक तसेच 122 उद्योग धंद्यातील असंघटीत कामागरांचे टाळेबंदी च्या कालावधीतील उदरनिर्वाहा साठी राज्य सरकार 10 हजार रुपये रोख अनुदान देण्यात यावे करीता प्रत्येकांचे वैयक्तीक अर्ज भरून सिटू कडे जमा केलेले असून यासाठी 25 मे पासून ते 30 जून पर्यंत अर्ज भरण्याची मोहिम राबवण्यात आली.यात रिक्षा चालक व मालक यांचे 11381, यंत्रमाग कामगार 10453, विडी कामगार 20557, असंघटीत 55086, असे एकूण 97477 अर्ज व त्याची सविस्तर माहिती असणारे CD व अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी मा. अजित देशमुख यांच्या हाती शिष्टमंडळामार्फत सुपूर्द केले. या शिष्टमंडळात सिटू चे राज्य महासचिव अँड एम एच शेख, नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी,सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी,युसूफ मेजर, व्यंकटेश कोंगारी आदी उपस्थित होते.

यावेळी लॉकडाऊन ते अनलॉक सुरू झाल्यापासून आजमितीला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासनाशी सातत्याने कष्टकरी कामगार वर्गाचे प्रश्न घेऊन लढा देत आहेत. त्यांना अन्नधान्य, उदरनिर्वाहासक्तही रोख अनुदान आणि रोजगार मिळावे म्हणून आज वयाच्या पंचाहत्तरीत सुद्धा कॉ नरसय्या आडम (मास्तर )कामगारांचे ओझे आपल्या पाठीवर घेऊन ( राज्य सरकार कडून अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक कामगाराला 10 हजार रोख अनुदान मिळावे या करिता त्यांचे वैयक्तीक अर्ज हमाल गाडी वर ) जिल्हा परिषद पूनम गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यँय हमाल गाडी ओढत आणले. हे पाहून दाक्षिणात्य प्रसिद्ध चित्रपट कुली नंबर 1आठवण झाल्याची लोकांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी सिटू चे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटपट झाली.त्यानंतर पोलीस आयुक्तालय आणि सदर बझार पोलीस ठाणे प्रशासनाकडून माजी आमदार कॉ आडम मास्तर यांच्यासह 16 कार्यकर्त्यांना अटक केले.
सदर या आंदोलनात कुरमय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, अनिल वासम दाऊद शेख,नरेश दुगाणे,अशोक बल्ला,शंकर म्हेत्रे, दीपक निकंबे, माशप्पा विटे, लिंगव्वा सोलापूरे, बापू साबळे,विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, बाबू कोकणे, किशोर मेहता, शकुंतला पानिभाते, अकील शेख, आसिफ पठाण,इलियास सिद्दीकी, जावेद सगरी,श्रीनिवास गड्डम, आप्पाशा चांगले, राजेंद्रप्रसाद गेंट्याल,रवी गेंट्याल, बाळासाहेब मल्ल्याळ,सनी शेट्टी,विजय हरसुरे आदी सह कार्यकर्ते परिश्रम घेतले.

Leave a Reply