Headlines

कामगार क्रांतीचा इतिहास कोणी पुसू शकणार नाही- कॉ आडम मास्तर

26 नोव्हेंबर चा देशव्यापी संप यशस्वी करा. कॉ आडम मास्तरांचे आवाहन.

सोलापूर/दत्ता चव्हाण -: कामगार क्रांतीचा इतिहास कोणी पुसू शकणार नाही. कारण त्यासाठी लाखो लोकांनी शहादत दिली आहे आणि ते त्यांच्या रक्ताने लिहिले गेले आहे. शोषणविरहित मानवी जीवनाचे स्वप्न कोणी साकार केले असेल ते केवळ कम्युनिस्ट विचारसरणीने आणि ते सत्यात उतरवण्याचे काम पहिल्यांदा सोव्हिएत रशियाने, कॉ लेनिन आणि त्यांच्या सोबतच्या लाखो कामगार ,शेतकरी, महिला, युवक, विचारवंत आणि कष्टकरी जनतेला. असे उद्गार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी सोव्हिएत क्रांतिदिनी केले.

आज सोव्हिएत रशियाच्या समाजसत्तावादी क्रांतीला 103 वर्ष पूर्ण झाली. तसेच भारतात राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या कामगार संघटनेला शताब्दी वर्ष तर देशातील सर्वात मोठी कामगार संघटना सिटू च्या सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी दत्तनगर पक्ष मध्यवर्ती कार्यालय येथे सकाळी11 वा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी कॉ आडम मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. सोलापूर शहर व जिल्ह्यात प्रत्येक शाखा व विभागात प्रंचड मोठ्या उत्साहात हा क्रांतिदिन साजरा करण्यात आला.

पुढे बोलताना कॉ.आडम म्हणाले की, या क्रांतीने पहिल्यांदाच भांडवली शोषणकर्त्या वर्गाची सत्ता उलथवून कामगार कष्टकरी वर्गाची सत्ता स्थापून सोव्हिएत रशियाने जगासमोर आदर्श निर्माण केला होता. त्यानंतर देशात सर्वांना शिक्षण, रोजगार निर्मिती यावर भर देत कामगार कष्टकरी वर्गाला, युवक ,महिला यांच्या विकासास चालना देत राज्य चालवले. हिटलरने रशियावर युद्ध लादले होते परंतु मजबूत कम्युनिस्ट विचाराच्या सरकारने त्याचा पाडाव केला.

ते पुढे म्हणाले की भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर कामगार संघटनेची स्थापना झाली ती 31 ऑक्टोबर 1920 शताब्दी वर्ष तर सेन्टर ऑफ ट्रेड युनियन (सिटू)या देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष असा त्रिवेणी संगम कामगार संघटनानी प्रचंड मोठे लढे देत कामगारांच्या हिताचे कायदे करायला भाग पाडले. पेन्शन, बोनस, हक्क रजा, कामाचा अधिकार, संघटित होण्याचा अधिकार कामगारांनी लढून मिळवले आहेत ते आज मोदी सरकार उध्वस्त करत आहे शेतकरीविरोधी 3 प्रतिगामी कायदे करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले आहे. याविरोधात संघटित पणे लढा देण्याची गरज आहे.येत्या 26 नोव्हेंबर ला कामगार संघटनानी पुकारलेल्या संपात मोठ्या प्रमाणात सामील होत हा संप यशस्वी करावे असे आवाहन केले.

यावेळी सिटूचे महासचिव कॉ एम एच शेख यांनी सिटूच्या क्रांतिकारी लढ्याचा इतिहास मांडला ते म्हणाले की, सिटू ही देशातील सर्वात मोठी कामगार संघटना स्थापने पासूनच सिटूने प्रचंड मोठे आंदोलने संप करीत कामगारांच्या हिताचे रक्षण करीत त्यांना न्याय मिळवून देत आली आहे. 80 लाख कामगार सभासद सेंटर ऑफ ट्रेड युनियन (सिटूचे) देशभरात आहेत. आज सिटूच्या सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा करताना व राष्ट्रीय पातळीवर पहिल्या कामगार संघटना स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा देत कामगार कष्टकरी वर्गाचा लढा अधिक मजबूत आणि तीव्र करण्याचा संकल्प केला.

या क्रांतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रजा नाट्य मंडळ कलापथकांनी क्रांतिकारी गीत सादर केले. दत्तनगरपरिसर लाल झेंड्यानी सजवून काढले होते. क्रांतिकारी घोषणांनी सारा दत्त नगर परिसर दुमदुमून टाकले.

यावेळी व्यासपीठावर अँडएम.एच.शेख , नगरसेविका कामिनी आडम,माजी नगरसेविका कॉ.नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, कॉ सिध्दपा कलशेट्टी, कॉ मुरलीधर सुंचू,कॉ युसुफ मेजर, माजी नगरसेविका सुनंदा बल्ला, कॉ म.हनिफ साथखेड, कॉ कुरमय्या म्हेत्रे, कॉ सलीम मुल्ला, कॉ शकुंतला पाणीभाते कॉ विल्यम ससाणे, अनिल वासम, प्रशांत म्याकल,चंद्रकांत मंजुळकर, नागेश विटकर विक्रम कलबर्गी, बापु साबळे ,कॉ किशोर मेहता, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, हसन शेख, दत्ता चव्हाण, कॉ अशोक बल्ला, कॉ दीपक निकंबे,विजय हरसुरे,नरेश गुल्लापल्ली ,रफिक काझी,मल्लेशम कारमपुरी, कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply