कवठे एकंदमध्ये चुरशीने 81.34 मतदान.

सांगली/सुहेल सय्यद


     सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने 81.34 मतदान झाले. प्रशासनाच्या चोक नियोजनामुळे व पोलिसांच्या बंदोबस्तामुळे सहाही वार्ड मध्ये शांततेत मतदान पार पडले. दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रात मतदानासाठी लोकांची गर्दी होती. 

    या वेळी गावात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे , भाजप-शेकाप युतीचे, व काँग्रेस मित्रपक्ष असे तीन पॅनल निवडणूकीमध्ये आहेत. मतमोजणी सोमवार 18 जानेवारी रोजी आहे.

वार्ड निहाय मतदान पुढीप्रमाणे- 

वार्ड क्र 1 = 81.39% (1344 पैकी 1094)

वार्ड क्र 2 = 76% (1072 पैकी 1410)

वार्ड क्र 3 = 83.31% (1007 पैकी 839)

वार्ड क्र 4 = 83.87% (1321 पैकी 1106)

वार्ड क्र 5 – 85.53% (1293 पैकी 1106)

वार्ड क्र 6 = 79.64% (1400 पैकी 1179)

Leave a Reply