Breaking News

कळंबवाडी (पा) येथे रक्तदान शिबिर संपन्न

 

बार्शी/विशेष प्रतींनिधी –शौर्य चक्र प्राप्त मेजर कुणाल गोसावी यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त व कै. शिवाजी गोविंद जगदाळे यांच्या स्मरणार्थ -शहीद मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी बहुउद्देशीय संस्था कळंबवाडी  (पान )  तेजस्विनी फाउंडेशन व  आर्णवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 29 नोव्हेंबर 2020 रोजी भगवंत रक्तपेढी बार्शी येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर गोसावी यांनी केले . यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री अॅड. झालटे सर यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी सतीश चव्हाण सर ,रवी जगदाळे, श्री आर टी. माने सर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

  सदर कार्यक्रमा प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अॅड. झालटेसाहेब यांनी शिवशंकर गोसावी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले याबद्दल समाधान व्यक्त  केले. 

  श्री धनंजय जगदाळे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शिवशंकर गोसावी यांनी तरुण वर्गामध्ये आदर्श निर्माण करण्याचे काम केले तरुणांची समाजाला गरज  असल्याचे मत व्यक्त केले. सतीश चव्हाण सर यांनी संस्थेच्या अध्यक्ष श्री शिवशंकर गोसावी  त्यांचा  कौटुंबिक आढावा उपस्थितांसमोर मांडला व आपल्या कळंबवाडी या छोट्या गावात राहून रक्तदान सारखे महान कार्य करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व ग्रामीण भागातील तरुणांनी .  शिवशंकर गोसावी सारखे  प्रोत्‍साहन घेऊन कार्य करावे असे आव्हान केले ‌.

 आभार दत्तात्रय गोसावी यांनी व्यक्त केले .उपस्थित पाहुणे नवनाथ सुर्वे , आप्पासाहेब दळवी , अॅड तेजस्विनी पाटील मॅडम , दत्तात्रय भारती, अक्षय राऊळ, सुरज पवार , मल्हारी पोळ , मयुर माने , विकी भोसले , पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी ,प्रमोद गोसावी, किरण काटमोरे , अतिश पवार, शिनगारे सर, धनंजय  मुकटे , समस्त गोसावी परिवार . मोठ्या प्रमाणात रक्तदाते उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!