Breaking News

कर्मवीर ना.मा.गडसिंग गुरुजी मित्र विद्यालय मळेगावची 100% निकालाची परंपरा कायम

मळेगाव/शुभम काशीद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इयत्ता 12 वी) परिक्षेचा निकाल दि.16 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला.कर्मवीर ना.मा.गडसिंग (गुरुजी) मित्र विद्यालय(माध्य व उच्च माध्यमिक) ,मळेगाव कला शाखेचा निकाल 100% लागला असून 100% निकालाची यशस्वी हॅट्रिक साधण्यात यश मिळाले आहे.

प्रथम क्रमांक -सुतार गायत्री विठ्ठल-85.27%,द्वितीय क्रमांक-मगर साक्षी जयदेव-83.53%,तृतीय क्रमांक -आपुणे प्रीती भारत-82.92% मार्क मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.त्यांना प्रा श्रीमंत वाघमोडे,प्रा सूरज गडदे,प्रा सुहास बुरगुटे, प्रा वैभव वाघमारे,प्रा राजकुमार आपुणे,प्रा शांतीलाल काशीद यांचे मार्गदर्शन मिळाले.संस्थेचे अध्यक्ष पिसाळ व्ही बी,संस्थेच्या सचिवा सखुबाई गडसिग,सहसचिव हेमंत गडसिंग,उपाध्यक्ष प्रमोद जगताप, संचालक विलास मिरगणे,प्राचार्य विकास बोराडे,पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा प्रभाकर गव्हाणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!