Breaking News

कर्जदारांना हप्ते भरण्याकरिता जानेवारी 2021 अखेर पर्यंत मुदतवाढ मिळावी -अखिल भारतीय छावा संघटना

अखिल भारतीय छावा संघटनेकडून  पंढरपूर चे प्रांताधिकारी यांना निवेदन देताना पदाधिकारी आणि कार्यकर्ते पंढरपूर/नामदेव लकडे -कोरोणा सारख्या महाभयंकर आजारामुळे संबंध देशातील नव्हे तर जगातील सर्व अर्थव्यवस्था कोलमडली आहे या महामारी मध्ये सर्वांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट व हालाखीची झाली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत आहे अशातच वित्तीय संस्था फायनान्स मायक्रोफायनान्स महिला बचत गट वाहन कर्ज व्यवसाय कर्ज सरकारी बँक या वारंवार कर्जदारांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तगादा लावत आहेत त्यामुळे संबंधितांना मानसिक त्रास होऊन अनेकांनी आत्महत्या देखील केले आहेत या सर्व बाबीचा विचार करून जानेवारी 2021 अखेरपर्यंत कर्जाचे हप्ते भरण्यास या कर्जदारांना मुदतवाढ मिळावी असेल आपणाकडून लेखी आदेश व्हावेत ही एवढीच विनंती आम्ही निवेदना द्वारे आपणा कडे करत आहोत.तसेच या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी करत आहोत.निवेदन देते वेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण,सोपान काका देशमुख, नवनाथ शिंदे,स्वप्नील शिंदे नाईक,नवनाथ करकमकर, विकी झेंड, ऋषिकेश श्रीरसागर, व इतर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!