एसएफआय च्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सोलापूर /शाम आडम – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया – (एसएफआय) सोलापुर जिल्हा कमिटी च्यावतीने ७४ वा  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एसएफआय चे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव व डीवायएफआय चे जिल्हा सचिव अनिल वासम यांच्याहस्ते शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकविण्यात आले. यावेळी एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी,माजी अध्यक्ष अनिल चौगुले, माजी जिल्हा सचिव मीरा कांबळे, गणेश भोईटे, निलेश कांबळे, दुर्गादास कनकुंटला, विजय साबळे, लक्ष्मी रच्चा, प्रभुदेव भंडारे, श्री आसादे, प्रशांत आडम, चमेली कांबळे, कोमल आदी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply