Headlines

एक भारत श्रेष्ठ भारत एनसीसीच्या नॅशनल कॅम्पमध्ये अनिशा नंदीमठने पटकावला द्वितीय क्रमांक

 

श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाची कॅडेट आहे अनिशा प्रसाद नंदीमठ

 

बार्शी / प्रतिनिधी – एनसीसीच्या   वतीने आयोजित “एक भारत श्रेष्ठ भारत” ऑनलाइन राष्ट्रीय कॅम्प मध्ये बार्शीच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातील कॅडेट अनिशा प्रसाद नंदीमठ हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 

अधिक माहिती अशी की, एनसीसी नॅशनल निदेशालयाने महाराष्ट्र, केरळ व लक्षदीप एन.सी.सी निदेशालय यांच्या संयुक्तपणे या कॅम्पचे आयोजन केले होते. हा कॅम्प 16 एप्रिल 2021 ते 21 एप्रिल 2021 या दरम्यान पार पडला.  या कॅम्पमध्ये एकूण  365 कॅडेट सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील सर्व बटालियन मधून कॅडेट सहभागी झाले होते. या कॅम्पमध्ये राज्यांचा इतिहास, भूगोल, संस्कृती, वारसा, सणवार, भाषा, लिडरची ओळख यांची देवाण-घेवाण झाली. कॅडेटनी चित्र दृष्य प्रणाली  (पीपीटी) व्दारे आपआपल्या राज्यांचा आभास निर्माण करून या राज्यांना भेट दिल्याची जाणीव निर्माण करून दिली.  तसेच बॅन ऑन सिंगल यूज प्लास्टीक अँड फिट इंडिया चळवळ सारख्या विषयांवर वैचारिक चर्चा घडवूण आणली . वेगवेगळ्या विषयात झालेल्या वाद-विवाद स्पर्धेमध्ये सहभागी कॅडेट पैकी अनिशा नंदीमठ हिला राष्ट्रीय निदेशालया ने द्वितीय क्रमांकाने निवडले.

या कॅम्पची सर्व जबाबदारी 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूर यांनी स्वीकारली होती.  यामध्ये कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रशांत नायर आणि एओ कर्नल एस. के. चव्हाण यांनी हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.  ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांनी कॅम्पसाठी मार्गदर्शन केले. एन.सी.सी महाराष्ट्र निदेशालयाचे ए.डी.जी. मेजर जनरल वाय.पी. खांटूरी यांनी बटालीयनच्या यशाबद्दल कौतुक केले आहे.

राष्ट्रीय पातळीवर अनिशा नंदीमठ हिने मिळवलेल्या  या यशाचे कौतुक बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मा. चेअरमन श्रीमती प्रभाताई झाडबुके, मा. संचालिका वर्षाताई झाडबुके तसेच झाडबुके महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ.एच.एस. पाटील यांनी केले आहे.बार्शी सारख्या ग्रामीण भागातून देशपातळीवर मिळवलेल्या या यशाचे कौतुक सर्व स्तरातून केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *