Headlines

उंदरगाव मध्ये पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन


माढा/राजकुमार माने –  रयत क्रांती संघटना व नवहिंदवी स्वराज्य कला क्रिडा व सांस्कृतिक बहु. संस्था, उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उंदरगाव गावामध्ये आज सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मोफत पशुचिकित्सालय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लाळ्या , खरखुत, लसीकरण, तसेच गर्भधारणा तपासणी, वांजपणा तपासणी, तसेच विविध आजार यांची  तपासणी करण्यात आली. 100 जणावराना लसीकरण करण्यात आले. 25 जनावरांची गर्भधारणा तपासणी करण्यात आली. ह्या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून जगप्रसिध्द चित्रकार रत्नदीप बारबोले आणि उंदरगाव चे युवा नेते अभयसिंह मस्के लाभले. तर प्रमुख उपस्थिती म्हणून उंदरगाव चे उपसरपंच ऋषिकेश तांबिले, व युवा नेते रवी चव्हाण उपस्थित होते.शेतकऱ्यांसाठी हे लसीकरण आणि गर्भधारणा तपासणी शिबीर मोफत आयोजन करण्यात आले होते. रयत क्रांती संघटना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या पुढे ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या सोबत राहील .त्याप्रसंगी दीपक आरे,  रविकांत कोळेकर, उत्तम साळुंके, शंकर साळुंके, अस्लम शेख, वामन तांबिले, मारुती सरवदे, बाबासाहेब वाघमोडे, सुनील नाईकवाडे, तुकाराम पाटील, विष्णू सुतार , संजय नाईकवाडे, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी रयत क्रांती चे पंडित साळुंके, संतोष कोळी, अमोल तांबिले, नितीन रंगा चव्हाण, औदुंबर लवटे, नितीन बापूराव चव्हाण, प्रवीण चव्हाण,आबासाहेब कोळेकर, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *