AarogyaBreaking News

इचलकरंजी मधील मुस्लिम समाजाने निर्माण केला आदर्श

प्रतिनिधी – इचलकरंजीमधील मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन लोकार्पण केले.यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर उपस्थित आहे. COVID_19 च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची सुमारे ३६ लाख रुपयांची रक्कम #WarAgainstVirus साठी उपयोगात आणली या रकमेतून १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आले आहेत. कोरोना च्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात, पात, धर्माच्या पलिकडे जाऊन कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाइन उद्घाटन करताना गौरवोद्गार काढले.    

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!