आ.प्रणिती शिंदे यांना सोलापूरच्या पालकमंत्री करा – काँग्रेस कार्यकर्ते राकेश नवगिरे यांची मा. मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाकडे विनंती


 


बार्शी / प्रतिनिधी – सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.विद्यमान पालकमंत्री यांना स्थानिक प्रश्नांची माहिती नसल्यामुळे तातडीचे निर्णय घेण्यास विलंब होतो आहे.आ.प्रणिती यांना स्थानिक प्रशासनाची नस माहिती असल्याने यंत्रणा हाताळण्यात वेळ लागणार नाही.म्हणून आ.प्रणिती शिंदे यांना सोलापूरच्या पालकमंत्री करा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते राकेश नवगिरे यांची मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाकडे केली आहे.                                                                                               


महाविकास आघाडी चे सरकार आल्यापासून सोलापूरचे दोन पालकमंत्री बदलले आहेत.विद्यमान पालकमंत्री हे तिसरे पालकमंत्री आहेत. सोलापुरला लाभलेले तिन्ही मंत्री हे स्थानिक नव्हते. त्यांना स्थानिक प्रश्न सोडवायला वेळ लागतो आहे . सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेला वारेवर सोडून पंढरपूर –मंगळवेढा  पोटनिवडणुकीच्या प्रचारात  व्यस्त होते. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती फारच गंभीर होत आहे.कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड ,ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. जीव गमावलेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे.          

  

आ.प्रणिती शिंदे ह्या जमिनी स्तरावर काम करत आहेत. त्या कार्यातत्पर असून अनेकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत.त्यांनी कोरोना रुग्णांना  वेळोवेळी रेमडेसिव्हिरचा पुरवठा केला आहे. आमदार निधीतून आ.शिंदेंनी सिव्हिल हॉस्पिटलला वेंटीलेटर तसेच एक्सरे मशिन तत्काळ उपलब्ध करून दिले आहेत. म्हणून अशा कार्यतत्पर आ.प्राणिती शिंदे यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नेमणूक करवी.अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते राकेश नवगिरे   यांनी मा.मुख्यमंत्री ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply